पुण्यातील येवलेवाडी स्थित निसर्गग्राम येथे योग प्रात्यक्षिकांचे आयोजन

Date:

पुणे, 6 एप्रिल 2023

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 76 दिवस बाकी आहेत; या पार्श्वभूमीवर योग विषयक जनजागृतीसाठी पुण्यातील आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने आज योग प्रात्यक्षिक आणि सरावाचे आयोजन केले होते.

पुण्यातील येवलेवाडी येथे सुरू झालेल्या निसर्गग्राम येथे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था व केंद्रीय संचार ब्यूरो यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी 7.00 वाजता आयुष मंत्रालयाच्या मानक ‘प्रोटोकॉल’नुसार सामूहिक योग प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले होते.

केंद्रीय संचार ब्यूरो या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या विभागाच्या कलाकारांनी याप्रसंगी योग आधारित गीते तसेच शास्त्रीय नृत्य याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने यावेळी सर्व सहभागींना राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने भरड धान्यापासून तयार केलेली न्याहारी दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...