Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेषांकांचे प्रकाशन

Date:

पुणे-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेषांकांचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला . यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेषांकांचे प्रकाशक प्रकाश वैराळ , जेष्ठ लेखक संपत जाधव , लेखक सुरेश पाटोळे , महेंद्र कांबळे , रवी आरडे , दीपक आवळे , विजय कुचेकर , अतिश कापसे आदी मान्यवर उपस्थित होते .

      या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेषांकांमध्ये माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे या विषयावर डॉ.प्रा. सुरेश चौथाईवाले , प्रकाश वैराळ लिखित मातंग समाजास ऐक्याशिवाय पर्याय नाही , लेखक सोपान खुडे लिखित अण्णाभाऊंची लोकनाट्ये ,लेखक  श्रीराम दुर्गे लिखित अण्णाभाऊची फकिरा समरसतेची धगधगती मशाल , डॉ. प्रा. शरद गायकवाड लिखित अण्णाभाऊ साठे आणि जात वास्तव , लेखक संपत जाधव लिखित अज्ञान आणि अंधःकारात अवतरला सूर्य  अण्णाभाऊ साठे अशा अनेक महाराष्ट्रातील नामवंत लेखकांनी या विशेषांकांत लेख लिहले आहेत . पुणे शहरात निघालेला मातंग संघर्ष महामोर्चाचे  आकर्षक छायाचित्र व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या विशेषांकाचे मुखपृष्ठ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे .

     पुणे शहरातील ग्रंथालयांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेषांक भेट देणार असल्याचे  विशेषांकांचे प्रकाशक प्रकाश वैराळ यांनी सांगितले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक लढवणार:वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दिसतील निवडणूक रणांगणात

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...

पुणे विमानतळावर तस्करीचा 2 कोटी 29 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा पकडला

बँकॉकहून आलेल्या तस्करास अटकपुणे - येथील विमानतळावर...

हिंदूविरोधात मस्ती करणारे 2 पायांवर घरी जाणार नाहीत- मंत्री राणे

परभणी :सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करत आहे. हिंदू समाजाविरोधात...