पुणे-भारतीय बौध्द महासभा व विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय बौध्द महासभाचे पुणे शहर माजी अध्यक्ष मोहन चौरे , भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष विलास चौरे , महापालिका सफाई सेविका सुशिला चिंतामण चौरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ” आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ” बहुजन समाज पार्टीचे नेते राहुल नागटिळक , बौद्धाचार्य गोरख निकाळजे , सफाई महिला कर्मचारी जैतुन साळुंके यांना सामाजिक कार्यकर्त्या प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ प्रदान करण्यात आले .
मंगळवार पेठमधील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभा अध्यक्ष रोहिणी टेकाळे , पुणे फॅमिली कोर्टबार असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. वैशाली चांदणे , जेष्ठ भारिप नेते वसंतराव साळवे , बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष दिलीप कुसाळे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट , भीमछावा प्रमुख शाम गायकवाड , लष्कर ए भीमाचे अध्यक्ष धनंजय सोनवणे , समीक्षा टाइम्सचे सुहास बनसोडे , फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे प्रमुख विठ्ठल गायकवाड , बहुजन मोर्चाचे प्रमुख राजेश खडके , पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख गौतम डोळस , भारिपपिंपरी चिंचवड नेते धनंजय कांबळे , बहुजन समाज पार्टीचे नेते दीपक पालखे , एल. एस. गायकवाड , सुहास गजरमल आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. किशोर चौरे यांनी केले तर आभार संजय भिमाले यांनी मानले .