पुणे- शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात दलित पँथर या सामाजिक संघटनेच्यावतीने इंग्रजी शाळांच्या प्रवेशद्वारावर ” जनआक्रोश आंदोलन “ करण्यात आले . दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या नेर्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . यावेळी इंग्रजी शाळांनी वाढविलेल्या वार्षिक शैक्षणिक शुल्क , डोनेशन व विविध प्रकारचा निधी आकारणी रद्द करावी , इंग्रजी शाळांनी नेमून दिलेल्या ठिकाणी शाळेचे गणवेश व इतर शालेय साहित्य खरेदी प्रकार त्वरित बंद करावेत , शैक्षणिक वर्ष २०१८ – २०१९ आर टी ई प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी , शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आर टी ओ मार्फत चाचणी करावी , विद्यार्थी वाहतूक आसन क्षमता मर्यादित असतानाही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक सेवा त्वरित बंद करावी , शाळेसमोरील रोडवर शाळेची विद्यार्थी वाहतूक सेवा वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जातात . ते बंद झाली पाहिजेत , इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकांना भेटण्याकरिता वेळेचे नियोजन करावे आदी मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या .
या सर्व मागण्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी येत्या १५ दिवसामध्ये अंमलबजावणी करावी अन्यथा दलित पँथर या सामाजिक संघटनेच्यावतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला आहे .
या जनआक्रोश आंदोलनमध्ये पृथ्वीराज भिसे , विल्यम नायडू , राहुल बनसोडे , इलियास शेख , निलेश पेटे , किरण टोंगे , राजू कांबळे , गणेश मांजळे , विकास शेवाळे , रणजित जोगदंड , अभिजित टेकाळे , शेखर पिसाळ , नागेश थोरात , अयाज सय्यद , महेश वाघमारे , शोहेब खान , मुन्ना मुजावर , असिफ सय्यद , फैय्याज पठाण , वाजिद शेख , इम्रान शेख , सलीम शेख , अझहर काझी , अब्दुल शेख , रहीम शेख , विजय गाडे , गंगाधर बनसोडे , भोलेनाथ अडगळे , तेजस नेत्रम , शिवपुत्र शिंदे , अशोक राठोड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

