Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शांती हे सामूहिक उद्दिष्ट बनले पाहिजे ‘ एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन ’ यांचे प्रतिपादन

Date:

पुणे :  “ धर्म ही जशी प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बांधिलकी आहे, अगदी त्याचप्रमाणे ती समाजिक बांधिलकी देखिल आहे. आज जगात शांतीची नितांत गरज आहे. मात्र ही शांती केवळ वैयक्तिक पातळीवरची नसून ती सामूहिक स्वरूपात देखील प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट बनली पाहिजे.” असे प्रतिपादन अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक ‘एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन’ यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र, (आळंदी) आणि डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे2017 सालचा एक अत्यंत महत्त्वाचा व  नोबेल  शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर जागतिक शांतता पुरस्कार-2017’  अमेरिकेतील येथील मॉर्मन कम्युनिटीचे मेंबर ऑफ द कोरम ऑफ ट्वेल्व्ह अ‍ॅपॉस्टल्स, व अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी येथील द चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन यांना  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पस, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
  तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊलीची सुवर्णजडित मूर्ती, माऊलींची प्रतिमा असलेले सुवर्णपदक,  सन्मानपत्र, शाल व रु. 5,25,000/- (सव्वापाच लक्ष  रूपये) असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
 याप्रसंगी अमेरिकेतील नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे हे होते.
यावेळी डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, श्री. फादर फंक, एल्डर रॉबर्ट विल्यम्स, श्री. मॅथ्यू हॉलंड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. स्वाती कराड- चाटे, श्री. नानिक रुपानी  आदी मान्यवर उपस्थित होते.
   एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन म्हणाले, “आज चर्च सुद्धा इथल्या वैविध्यपूर्ण आणि तरीही एकसंध असणार्‍या विश्‍वासाशी एकरूप झाला आहे. अब्जावधी श्रद्धावानांसाठी आपण कोण आहोत अणि आपण कसे जगत असतो हे माहीत नसते. परंतु सर्व धर्मांच्या लोकांसाठी शांती आणि समाधान स्थापित करण्याच्या हेतूने धर्म, देश व समाजाला देखील या विश्‍वासाचा लाभ होतो. राष्ट्रीय समृद्धीवर धर्माचा मोठा प्रभाव पडतो. सर्व प्रकारचे लोक खर्‍या धार्मिक लोकांवर जास्त विश्‍वास ठेवतात.”
  डॉ. मायकेल नोबेल म्हणाले, “शांततेमध्ये नोबेल पारितोषिक हे सहसा शांततेच्या प्रसारासाठी जगभर एक गमक मानले जाते. पण त्या शिवाय इतरही प्रतिष्ठीत पूरस्कार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हा विश्‍व शांती पूरस्कार आहे. शांततेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार भारतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.”
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, “ आज ज्या व्यक्तीस हा सन्मान्य पुरस्कार दिला जात आहे, त्या व्यक्तीमध्येच मोठेपणा व नम्रपणा आहे. ज्या संताच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यांनी निर्मिलेले पसायदान ही अशी एकमेव प्रार्थना आहे की ती जर इतर कोणत्याही धर्म चिन्हाच्या खाली लावली गेली तर ती त्याच धर्माची प्रतिनिधी असेल. हेच या पसायदानाचे खरे सौंदर्य आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेला समर्पित केले आहे. आज आम्ही सगळे जण जगात शांतता नांदावी आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे या कारणासाठी एकत्र आलो आहोत. ही एक लहान सुरुवात आहे. आमच्या संस्थेने स्वामी विवेकानंदाच्या वचनांचे अनुसरण केले आहे.”
प्रास्ताविकपर भाषणात प्रा. राहुल वि. कराड यांनी पुरस्काराची माहिती दिली.
सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. आभार प्रा. स्वाती कराड- चाटे यांनी मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...