पुणे, : “आज पदवी प्राप्त करून तुम्ही औद्योगिक जगात प्रवेश करीत आहात. तेथे अघिक नफा मिळविणे,हा उद्देश असतो.त्यासाठी तुम्हाला अनुभवातून शिकावयाचे असते.खरे म्हणजे आता संपूर्ण जग हेच तुमच्यासाठी खुले विद्यापीठ असणार आहे.” असे उद्धगार टीव्हीएस मोटर्सच्या पश्चिम विभागाचे(विक्री) उपमहाव्यवस्थापक श्री. अजय गर्जे यांनी काढले. माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेज (मिटकॉम)च्या पीजीपी व एक्झिक्यूटिव्ह एमबीएच्या 8व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड हे होते.
यावेळी माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या आयटी विभागाच्या संचालिका प्रा. सुनिता मंगेश कराड,माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका प्रा.डॉ. सायली गणकर व प्रा.डॉ.गणेश टण्णू हे उपस्थित होते.
श्री.अजय गर्जे म्हणाले“ आता वैयक्तिक प्रगतीपेक्षा सांघिक प्रयत्न अधिक महत्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी संवाद कौशल्य,समन्वय इत्यादींची गरज असते. आपण भारतीय नेमके येथेच कमी पडतो. कठोर परिश्रम आणि निष्ठा याची येथे कसोटी लागते. कंपनीला आवश्यक असलेले गुण आणि कार्यपध्दती अंगी बाणविल्यास तुम्हाला उत्कर्षाचे दरवाजे खुले होतील.तुमच्या समोर उभ्या असलेल्या समस्या यशस्वी रीतीने सोडविल्या आणि येणार्या आव्हानाना धैर्याने तोंड दिले, तर तुम्ही खर्या अर्थाने यशस्वी व्यवस्थापक -उद्योजक ठराल.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “नवनवीन संशोधन हाच यशाचा मूलमंत्र आहे. स्वतावर विश्वास ठेवा.नैतिक मूल्यांचे पालन करा. आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उत्पादक कार्यासाठी योग्य प्रकारे उपयोग करा.आपले वरिष्ठ व इतर व्यवस्थापक यांच्या कार्यपध्दतींचे अनुकरण करून आपली कार्यक्षमता वाढवा. हळूहळू यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल होत राहील.”
प्रा. सुनिता मंगेश कराड यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
प्रा. डॉ. सायली गणकर यांनी प्रास्ताविक केले.
स्वाती बनकर यांनी सूूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ.गणेश टण्णू यांनी आभार प्रदर्शन केले