पुणे-
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने नवी सांगवी येथील राजमाता जिजाऊ उद्यान व कृष्णा चौक येथे आज सकाळी सहा वाजता सरत्या वर्षाला निरोप देताना व नव वर्षाच्या स्वागत करताना व्यसनाच्या आहारी न जाता दारु न पिता दुध पिवून व भारतीय संस्कृती पंरपरेनुसार नववर्षाचे स्वागत करावे. व तरुन व्यसनाधीन होवू नेय म्हणुन दुध वाटप करत व्यसनमुक्तीची जनजागृती केली. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड व त्यांच्या सहकार्याने सदर व्यसनमुक्ती करुन नव वर्षाचे स्वागत करावे म्हणुन आयोजन केले होते. परीसरातील व संस्थेचे पदाधिकारी असे तीनशे लोकांनी जनजागृती केली. या वेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की सामाजिक जाणीवेतुन हा उपक्रम घेण्यात आला याचा हेतु हा समाजात मानवी हक्क व अधिकाराची जनजागृती करीत असताना हे लक्षात आले की अजचे सुशिक्षित तरुण ल दारुच्या व्यसनापाई आपल्या संसार उध्वस्त करीत आहेत.वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा सरत्या वर्षाला निरोप देण्याचा बहाणा करून पार्टी करुन व्यसनाच्या आहारी जात आहेत.त्यामुळे कितीकांचे आयुष्याची धुळदान होत आहे.असे होवू नये म्हणु ” नशा करी आयुष्याची धुळदान” देश को बढाना हैं नशासे मुक्त करणा हैं” जन जन का यही हैं संदेश नशेसे मुक्त करणा है आपणा देश आशा स्लोगने हा जनजागृती उपक्रम राबविला आहे.
यावेळी संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर कमिटी सर्व पदाधिकारी, नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार , बाळासाहेब काकडे, उपाध्यक्ष विकास शाहाने , प.महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड , विनायक विसपुते , अरविंद मांगले, आधी पदाधिकारी उपस्थित होते.सदर उपक्रममानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आला.