पुणे -आज पुण्यात मान्सूनचे आगमन झाले .आज सोमवारी (दि.12) शहरात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला मात्र रस्त्यावर वाहनचालकांची तारांबळ उडाली .पहिल्याच पावसाने गटारे तुंबली आणि रस्त्यावरून धोधो पाणी वाहू लागले .
सोमवारी दुपारपासून पुण्यात आणि पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, निगडी, आकुर्डी, वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता.