Ø ४०० किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता या सेगमेंटमध्ये प्रथमच सादर, ६८ लिटर क्षमतेच्या २ सीएनजी टाक्या.
Ø ३५.१ किमी प्रति किलो इतके या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मायलेज, त्यामुळे गाडी चालवण्याचा खर्च अत्यंत कमी आणि म्हणून जास्त बचत.
Ø या वर्गातील वाहनांमधील (मिनी ट्रकमध्ये) ६५० किलो इतकी सर्वाधिक पेलोड क्षमता.
Ø गाडी वळवण्याची त्रिज्या ४.३ मीटर अशी सर्वात कमी, त्यामुळे अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवर गाडी वळविणे सोयीचे.
Ø भारतातील लहान व मध्यम स्तरावरील व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्ह अशी मालवाहतूक करू शकणारी लॉजिस्टिक्सची सोय.
Ø सादरीकरणाच्या निमित्ताने ऑफर : १.९९ टक्के व्याज दर, ४ वर्षांच्या कालावधीत ५ लाखांपर्यंतची बचत.
Ø देखभालीचा खर्च सर्वात कमी (०.२२ रु. प्रति किमी)
Ø स्पर्धात्मक किंमत ५.२६ लाख रु. (एक्स-शोरूम, पुणे), महिंद्राच्या भारतातील सर्व वितरकांकडे उपलब्ध.
मुंबई, ८ ऑगस्ट, २०२२ : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअॅंडएम) या भारतातील लहान व्यावसायिक वाहने (एससीव्ही) बनविणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आज ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ सादर करीत असल्याची घोषणा केली. इंधन कार्यक्षमता आणि मायलेज यांमध्ये नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या विद्यमान जीतो प्लस या श्रेणीत हे नवीन वाहन कंपनीने सादर केले आहे.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ या वाहनाची एका दमात ४०० किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे, तसेच या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट असे ३५.१ किमी प्रति किलो इतके मायलेज ते देते. ६५० किलोचा, या उद्योगातील सर्वोत्तम इतका, भार वाहून नेण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळेच ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ हे मॉडेल नफ्यातील वाढ आणि ग्राहकांची समृद्धी करणे यांकरीता आदर्श ठरते.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ची किंमत ५.२६ लाख रु. (एक्स-शोरूम, पुणे) इतकी स्पर्धात्मक ठेवण्यात आलेली आहे. अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरण करण्यासाठी आणि वाहतूकदारांच्या लॉजिस्टिक्सविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे वाहन खास विकसित करण्यात आले आहे. अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्यांनी हे वाहन सुसज्ज आहे. अखेरच्या टप्प्यापर्यत वाहतूक करणाऱ्या भारतभरातील लहान व मध्यम स्वरुपातील व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या गरजांसाठी हे अगदी योग्य आहे.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’मध्ये एक शक्तिशाली इंजिन आहे. ते १६००-२२०० आरपीएमवर १५ केडब्ल्यूची क्लास-लीडिंग पॉवर आणि ४४ एनएमचा टॉर्क देते. उत्कृष्ट पिक-अप, अॅक्सलरेशन आणि ग्रेडेबिलिटी यांची हमी या इंजिनामुळे मिळते. त्यामुळे ‘जीतो प्लस सीएनजी चारशे’ ही गाडी अगदी तीव्र चढावरही जास्तीचा भार वाहून नेऊ शकते. देखभालीचा कमी खर्च आणि कोणताही भार वाहून नेण्याची क्षमता, यांमुळे ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ बाजारातील ऑफरपेक्षा ३० टक्के जास्त नफा देईल.
‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह एससीव्ही’ विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित सागर म्हणाले, “एससीव्हीच्या बाजारपेठेत महिंद्रा दोन दशकांहून अधिक काळ आघाडीवर आहे. आम्ही वाहतूक व्यवसायातील वाढती आव्हाने समजून घेतो आणि आमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांनुसार योग्य ते उपाय देण्याचा सतत प्रयत्न करतो. मला विश्वास आहे की, ‘महिंद्राच्या’ इतर उत्पादनांप्रमाणेच, ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ ही गाडी सीएनजी वाहनांसाठी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करील. आमचे ग्राहक आता या गाडीतून लांबवरचा प्रवास करू शकतील, तसेच सारख्या रिफिलिंगची काळजी न करता शहरांतर्गत मालवाहतूकही करू शकतील. आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात भरभराट होण्यास ही गाडी मदत करेल, कारण त्यांच्या विशिष्ट आवश्यकतांसाठी तिच्यामध्ये उत्कृष्ट अनुकूलता आहे.”
श्री. सागर पुढे म्हणाले, “शाश्वत गतिशीलता आणि पर्यावरणासाठी महिंद्रा कटिबद्ध आहे आणि नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे या गाडीचे सादरीकरण हे त्या दिशेने टाकलेले एक सक्रिय पाऊल आहे.”
‘महिंद्रा’च्या झहीराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात उत्पादित होणाऱ्या ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ या गाडीवर ३ वर्षे किंवा ७२ हजार किलोमीटर (जे अगोदर येईल, त्याप्रमाणे) इतकी वॉरंटी देण्यात येत आहे. या श्रेणीच्या वाहनांमध्ये ही सर्वात जास्त वॉरंटी ठरते. तीन आकर्षक रंगांमध्ये हे वाहन उपलब्ध असेल : डायमंड व्हाइट, अल्ट्रामरिन ब्लू आणि सनराइज रेड. देशातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक असलेल्या महिंद्राच्या विस्तृत सर्व्हिस नेटवर्कचा लाभ या वाहनाला मिळणार आहे.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ची प्रमुख वैशिष्ट्ये
उच्च कमाईची क्षमता
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ या वाहनाची एका दमात ४०० किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे. या विभागातील हे पहिलेच वैशिष्ट्य आहे. शिवाय, या गाडीचे मायलेज ३५.१ किमी प्रति किलो इतके उत्कृष्ट आहे. ‘जीतो प्लस सीएनजी चारशे’मध्ये एकूण ६८ लिटर (४०एल+२८एल) क्षमतेच्या २ सीएनजीच्या टाक्या आहेत. गाडीच्या डेकची लांबी २२५७ मिमी (७ फूट) असून हिची पेलोड क्षमता ६५० किलो आहे. हिच्या देखभालीचा खर्च सर्वात कमी (०.२२ रु. प्रति किमी) आहे आणि हिची किंमतही सर्वात परवडणारी आहे. त्यामुळे इतर सीएनजी मिनी ट्रक्सच्या तुलनेत ‘जीतो प्लस सीएनजी चारशे’मुळे सुमारे ३० टक्के जास्त बचत होते. या गाडीवर ३ वर्षांची किंवा ७२ हजार किलोमीटरची (जे अगोदर येईल, त्याप्रमाणे) वॉरंटी देण्यात आली आहे. अखेरच्या टप्प्यापर्यत वाहतूक करणाऱ्या भारतभरातील लहान व मध्यम स्वरुपातील व्यावसायिक आणि व्यापारी यांना लॉजिस्टिक्स व अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरणासंदर्भातील विश्वासार्ह ऑफर देण्याच्या उद्देशाने, सादरीकरणाच्या निमित्ताने १.९९ टक्के व्याजदर आकारण्याचे कंपनीने ठरविले आहे. यातून या व्यावसायिकांची ४ वर्षांच्या कालावधीत ५ लाखांपर्यंतची बचत होईल.
या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ हा ग्राहकांच्या आव्हानात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या डिझाइन केलेला आहे. याचे शक्तिशाली इंजिन १६००-२२०० आरपीएमवर १५ केडब्ल्यू पॉवर आणि ४४ एनएम टॉर्क तयार करते. या सेगमेंट-लीडींग पॉवर व टॉर्कमुळे, ‘जीतो प्लस सीएनजी चारशे’ या वाहनामध्ये चालविण्याची व भार वाहून नेण्याची क्षमता खूप मोठी आहे. ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ ४.३ मीटर इतक्या कमी त्रिज्येत वळते. या वैशिष्ट्यामुळे ती शहरांमधील अरुंद आणि गजबजलेल्या रस्त्यांवर सहजपणे चालविता येते.
सर्वोत्तम श्रेणीतील सुरक्षितता
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’मध्ये तिच्या श्रेणीतील उच्च सुरक्षा मिळते. अपघात झाल्यास गाडीचा चालक आणि सहचालक यांना उत्तम सुरक्षा मिळण्याच्या दृष्टीने गाडीच्या केबिनची रचना करण्यात आली आहे. सेमी फॉरवर्ड डिझाइन, मजबूत बॉडी आणि उत्तम संतुलनासाठी २५०० मिमीचा मोठा व्हीलबेस अशा उत्कृष्ट चॅसिसमुळे ही गाडी अगदी सुरक्षित बनली आहे. नेटका आकार आणि आकामशीर स्टीअरिंग यांमुळे शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये आणि सर्वोत्तम श्रेणीतील पिक-अप आणि अॅक्सलरेशन यांमुळे वर्दळीच्या रस्त्यांवर ती सहजपणे चालवता येते.
स्टाइलिश, प्रीमियम स्वरुपाची बाह्यरचना
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ला आकर्षक वैशिष्ट्यपूर्ण फ्रंट ग्रिल बसविण्यात आले आहे. त्यामुळे गाडीला स्टायलिश आणि समकालीन लूक मिळतो.
आराम आणि वैशिष्ट्ये कारसारखीच
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’मध्ये कारसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत, उदा. जास्त आरामासाठी मोठी हेडरूम आणि लेगरूम, प्रशस्त केबिन आणि लांबवरचा प्रवास सुखकर होण्यासाठी आरामदायी आसन. उत्तम अर्गोनॉमिक्स आणि अलगद गीअरशिफ्ट यांमुळे ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’चे ग्राहक आणि चालक गाडी अधिक सफाईने चालवू शकतात.
‘महिंद्रा जीतो’बद्दल
जून २०१५मध्ये सादर झालेल्या, ‘जीतो’ने महिंद्राला ‘स्मॉल कमर्शियल व्हेइकल’ (एससीव्ही) सेगमेंटमध्ये अग्रगण्य म्हणून यशस्वीरित्या स्थापित केले आहे. उत्कृष्ट कार्यप्रदर्शन, कमी देखभाल, या वर्गातील गाड्यांमधील सर्वोत्तम मायलेज आणि ३० टक्के वाढीव कमाई करून देण्याची क्षमता या वैशिष्ट्यांमुळे ‘जीतो’ने इतर गाड्यांच्या तुलनेत वरचढ श्रेणी मिळवली आहे.
एक टनाहून कमी लोडच्या सेगमेंटमधील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आठ मिनी ट्रक्सची मॉड्यूलर श्रेणी असलेले जीतो हे या श्रेणीतील पहिले उत्पादन आहे. जीतो सादर झाल्यापासून, तिची मॉड्यूलर रेंज, अतुलनीय अष्टपैलुत्व आणि विविध विभागांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठीची उत्कृष्ट कार्यक्षमता यांमुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत मालवाहतूक करण्यामध्ये हे वाहन एक ‘गेम चेंज’र ठरले आहे. अगदी सुरळीत कामगिरी व्हावी या दृष्टीने ‘जीतो’चे डिझाईन करण्यात आले आहे. ही वाहने ३७.६ किलोमीटर प्रति लिटर इतकी इंधन कार्यक्षमता देऊ शकतात. या विभागातील ही सर्वोत्तम कार्यक्षमता आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच ‘जीतो’ला ‘अपोलो सीव्ही ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांचेही मोठे पाठबळ लाभले आहे. उत्पादनाच्या कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन, ‘जीतो’ने ‘मेक इन तेलंगणा’च्या व्हिडिओमध्येदेखील स्थान मिळवले आहे आणि तिला ई-कॉमर्स आणि कॅप्टिव्ह ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. ‘अॅमेझॉन’ने आपल्या दुचाकी अपग्रेड कार्यक्रमासाठी पसंतीचे वाहन म्हणून ‘जीतो’ची निवड केली आहे.
‘महिंद्रा’विषयी :
१९४५मध्ये स्थापन झालेला महिंद्रा समूह हा शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये २,६०,००० कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक सन्मानप्राप्त बहुराष्ट्रीय महासंघ आहे. शेती उपकरणे, उपयुक्तता वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये हा समूह भारतात आघाडीवर आहे. उत्पादनाच्या संख्येचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. अपारंपरिक ऊर्जा, कृषी, लॉजिस्टिक्स, आतिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांत या समुहाचे उल्लेखनीय अस्तित्व आहे.
जागतिक स्तरावर ईएसजीचे नेतृत्त्व करण्यावर, ग्रामीण भागांत समृद्धी आणण्यावर आणि शहरी जीवनमान वाढवण्यावर महिंद्रा समुहाने भर दिला आहे. समाजाच्या आणि भागधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे या समुहाचे उद्दिष्ट आहे.