शहरांतर्गत मालवाहतुकीसाठी पर्याय
· सर्वोत्कृष्ट श्रेणीतील मायलेज – १७.२ किमी प्रति लिटर; गाडी चालविण्याचा खर्च कमी आणि त्यामुळे बचत जास्त.
· या श्रेणीतील वाहनांमधील सर्वाधिक पेलोड क्षमता – १५०० किलो; मोठा २६४० मिमीचा कार्गो बॉक्स, दणकट सस्पेन्शन. ४८.५ केडब्ल्यू इतक्या उच्च शक्तीचे इंजिन आणि या श्रेणीतील गाड्यांमध्ये आढळणारा १९५ एनएम इतका सर्वोत्तम टॉर्क.
· सुलभतेसाठी लहान बॉनेटचे डिझाइन; त्यामुळे शहरातील अरुंद आणि गजबजलेल्या रस्त्यांवर गाडी उत्तम प्रकारे चालविण्याची सोय.
· रु. ७.९७ लाख अशी आकर्षक किंमत (एक्स-शोरूम, मुंबई)
· संपूर्ण भारतातील स्टँड ऑपरेटर, लहान व मध्यम स्तरावरील व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन अंतिम टप्प्यातील कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट.
मुंबई, : ‘बोलेरो पिक-अप’ या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या पिक-अप ब्रँडची उत्पादक कंपनी, ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ (एम अँड एम), हिने तिच्या विद्यमान ‘पिक-अप’ श्रेणीतील वाहनांव्यतिरिक्त, ‘न्यू बोलेरो सिटी पिक-अप’ हे वाहन सादर केले आहे. याबाबतची घोषणा कंपनीने आज केली. या नवीन मॉडेलमध्ये सर्वोत्तम मायलेज, सर्वोत्कृष्ट पेलोड क्षमता, रुंद कार्गो आणि या श्रेणीतील वाहनांच्या इंजिनमध्ये असलेला सर्वोत्तम टॉर्क यांचा अंतर्भाव आहे. याव्यतिरिक्त, लहान आकाराच्या बॉनेटमुळे तुलनेने कमी त्रिज्येमध्ये ही गाडी वळू शकत असल्यामुळे अरुंद आणि गजबजलेल्या शहरी रस्त्यांवर हे मॉडेल सहज चालते. हे सर्व घटक मिळून नवीन बोलेरो सिटी पिक-अप शहरांतर्गत उपयोगासाठी सर्वात योग्य वाहन बनते. ‘नवीन बोलेरो सिटी पिक-अप’ ७.९७ लाख रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.
या प्रसंगी बोलताना ‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह’चे मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट हरीश लालचंदानी म्हणाले, “ग्राहकांच्या गरजा व त्यांचे समाधान, तसेच बाजारातील अंतर्गत माहिती यांवर आमचे सखोल लक्ष असल्यामुळे आम्ही आमच्या विवेकी ग्राहकांच्या बहुमुखी गरजांसाठी योग्य आणि उपयुक्त अशी उत्पादने विकसित करीत असतो. आमच्या अत्यंत यशस्वी अशा ‘बोलेरो पिक-अप’ श्रेणीमध्ये आणखी एक भर घालताना आम्हाला आनंद होत आहे. ‘नवीन बोलेरो सिटी पिक-अप’ ही गाडी शहरांतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कामगिरी, विश्वासार्हता आणि नफा यांचा विचार करून सर्वोत्तम श्रेणीतील उत्पादने बनविण्याच्या व वितरीत करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांमुळे पिक-अप सेगमेंटमध्ये गेल्या २२ वर्षांपासून महिंद्राचे नेतृत्व कायम टिकून आहे.”
‘नवीन बोलेरो सिटी पिक-अप’मध्ये २५२३ घन सेमी, m2Di, फोर-सिलेंडर डिझेल इंजिन बसविण्यात आले आहे. त्यातून ४८.५ केडब्ल्यू शक्ती आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी १९५ एनएम इतका या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट असा टॉर्क मिळतो. त्याचप्रमाणे १७.२ किमी प्रति लिटर असे मायलेजही ही गाडी देते. शहरांतर्गत मालवाहतूक करताना कोणत्याही प्रकारचा भार पेलण्यासाठी या गाडीचे मागील सस्पेन्शन विशेष दणकट बनविण्यात आले आहे. नवीन ‘सिटी पिक-अप’मध्ये १५०० किलोग्रॅमची पेलोड क्षमता आणि २६४० मिमीचा मोठा कार्गो बॉक्सदेखील आहे. या गाडीचे मोठे २१५/७५ आर१५ (३८.१ सें.मी.) टायर रस्त्यांवर चांगली पकड देतात. हिच्या ‘केबिन अर्गोनॉमिक्स’चा विचार केला असता, तीमध्ये सह-चालकाचे सीट मोठ्या आकाराचे देण्यात आले आहे. त्यामुळे गाडी चालविण्याचा उत्तम अनुभव मिळतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’ ही शहरी वस्तूंच्या वाहतुकीसाठी एक आदर्श पिक-अप बनते.
नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’वर ३ वर्षे / १ लाख किलोमीटर अशी वॉरंटी देण्यात आली आहे
तिच्या देखभालीचा खर्चही अत्यंत कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक नफा मिळवण्याची हमी मिळते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीवरून ही गाडी सहजतेने प्रवास करू शकते आणि त्यामुळे व्यवसायाच्या अधिक संधीही देऊ शकते.
मालवाहतुकीच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी महिंद्राकडे छोट्या व्यावसायिक वाहनांचा सर्वात विस्तृत असा पोर्टफोलिओ आहे. ‘बोलेरो पिक-अप’च्या फ्लॅगशिप श्रेणीच्या विश्वासार्हतेमुळे आणि देखभालीच्या सुलभतेमुळे तिचे १८ लाखांहून अधिक ग्राहक आजही आनंदात आहेत. त्याचबरोबर, महिंद्रा वितरकांच्या व्यापक नेटवर्कमुळे बोलेरो पिक-अप ग्राहकांसाठी दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगची सुविधा कायम उपलब्ध आहे.
नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’चा टिकाऊपणा आणि त्यामध्ये उपलब्ध असणारे कस्टमायझेशनचे पर्याय यांमुळे हे वाहन विविध व्यवसायांचे मालक, भाजी विक्रेते, मालवाहतूकदार यांच्यासाठी अगदी सर्वोत्तम ठरते. नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’ खरेदी करू इच्छिणारे इच्छुक ग्राहक एम अँड एमच्या अधिकृत वितरकांना भेट देऊ शकतात. https://auto.mahindra.com/dealer-locator या वेबसाईटवरून ते आपल्या नजीकचा अधिकृत वितरक शोधू शकतात.