पुणे- नाले बुजवून , रस्त्याचे पदपथ गिळंकृत करून वा अन्य मार्गाने सरकारी जमिनी लाटून राजकीय आसरा घेऊन बिल्डरांनी पुण्याचे वाट्टोळे केले असल्याचे जगजाहीर आहे. आता पुण्याचा मुकुटमनी मानला जाऊ लागलेल्या कोथरूडहि यातून सुटलेले नाही . आता सध्या तर कोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला खुले आम बुजविला जात असल्याचे दिसत असूनही त्यावर ठाम भूमिका घेताना कोणी दिसत नाही या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत त्वरित कार्यवाही करावी…अशी मागणी केली आहे.
त्यांनी आयुक्तांना असे म्हटले आहे कि,’काही नागरिकांच्या तक्रारी वरून आज सकाळी कोथरूड च्या मृत्युंजय मंदिराशेजारील नाल्याची पाहणी केली असता अनेक गोष्टी निदर्शनास आल्या.मुळात संपूर्ण नाला हिरवं गार्डन नेट लावून बंद केल्यामुळे आत काय चाललंय हेच कळत नाही. आज आत जाऊन बघितलं असता चित्र भयावह असल्याचे निदर्शनास आले.याबाबतीत देवदेवेश्वर संस्थान चे विश्वस्त रमेश भागवत यांची भेट घेतली असता ” सदर नाला आमच्या वहीवाटीचा असून आम्ही देखील तेथे चाललेल्या घडामोडी बाबत प्रशासनास पत्र लिहिलं आहे असं त्यांनी सांगितले “.त्यांच्या पत्रावर प्रशासनाने काय कारवाई केली हे स्पष्ट करावे. तसेच त्वरित ह्या ठिकाणी पथक पाठवून नेमके काय चालले आहे त्याचा अहवाल जाहीर करावा.
येथे चाललेल्या बांधकामामुळं नाला बुजण्याची भीती व्यक्त होतं असून त्यामुळे पूर आल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे स्पष्टपणे नमूद करत आहे.
कोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला बुजवितोय कोण ?
Date: