पुणे-खडकवासला मतदारसंघातील आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली गोकुळनगर, नऱ्हे येथे गणपती बाप्पाच्या आरतीने पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा जे.एस.पी.एम. परिसरात संपन्न झाली, ज्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हा विशेष ठरला.पदयात्रेदरम्यान नागरिकांनी आमदार भिमराव तापकीर यांना सलग चौथ्या विजयाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नावाने घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
आज दुपारी धायरी भागात होणार पदयात्रा
गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला मतदारसंघातील विविध भागांत आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा होत असून, नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे. आज दुपारी धायरी भागात होणाऱ्या पदयात्रेची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली असून यामध्येही नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.
आमदार तापकीर यांच्या कामाची जमेची बाजू
आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्यात आले. हे प्रकल्प केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात सुरू असून, त्याचा फायदा मतदारसंघातील सर्व स्तरांतील लोकांना होत आहे. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे आणि प्रामाणिक कामामुळे ते नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
आमदार तापकीर म्हणाले, खडकवासला मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचे एक मत हे माझ्यासाठी सर्वोच्च महत्त्वाचे आहे. नागरिक माझ्या कामाची दखल घेऊन मला पुनश्च संधी देण्यासाठी उत्सुक आहेत, याचा मला विश्वास आहे.
उपस्थित मान्यवर व पदाधिकारी
यावेळी पदयात्रेमध्ये खालील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते:
मा. जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई सत्यवान भूमकर
खडकवासला मतदारसंघ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आणि मा. उपसरपंच सागर भूमकर
मा. उपसरपंच सुशांत कुटे
सोमनाथ कुटे, दिलीप नवले, आनंद दांगट, कोमल कुटे
तसेच भाजप-महायुती मित्र पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.