पुणे, दि. ३० : खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार यांनी आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल कॉलेज येथील निवडणूक कार्यालयास भेट देवून आढावा घेतला.
निवडणुकीसाठी उभारलेल्या प्रत्येक कक्षाच्या कामकाजाबद्दल आणि कार्यपद्धतीबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडून श्री. संजीव कुमार यांनी माहिती घेतली. निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष्य ठेवण्याच्या अनुषंगाने महत्वाचे असणारे सुरक्षाव्यवस्था तसेच संवेदनशील मॅपिंग कक्ष आणि निवडणूक प्रचाराविषयक आवश्यक परवानग्या देणाऱ्या एक खिडकी कक्षाचा देखील श्री. संजीव कुमार यांनी आढावा घेतला. प्रत्येक कक्षासाठी निवडणूक आयोगानी आखलेले कार्ये व त्या संबंधित सर्व कागदपत्रे परिपूर्ण ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, नायब तहसिलदार सचिन आखाडे, एक खिडकी कक्ष समन्वयक स्वाती नरुटे, माध्यम कक्ष समन्वयक विजयेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

