पुणे,दि.३० :- हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने श्री.भीम सिंग यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरीक्षक श्री. भीम सिंग यांचा निवासाचा पत्ता ए- ३०५ व्हीव्हीआयपी-१ सर्किट हाऊस, (ग्रीन बील्डींग)२४, क्वीन्स् गार्डन, कॅम्प, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६५७३६४६ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांचा संपर्क क्रमांक ९७६५९४११६६ असा आहे. निवडणूक निरीक्षक भीम सिंग यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.
श्री.भीम सिंग यांनी हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन,तेथील निवडणूक कामकाज प्रक्रियेचा आढावा घेतला. सर्व नोडल अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सुचना केल्या. .तदनंतर पुणे कॅन्टेांमेंट विधानसभा नामनिर्देश प्रक्रिया पाहणी केली.
०००