Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला अत्याधुनिक असा α६७०० कॅमेरा बाजारात आणण्याची सोनी इंडियाची घोषणा

Date:

आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या वस्तूची प्रतिमा टिपायची आहे ते अतिशय स्पष्ट आणि निश्चितपणे ओळखणे आणि स्थिर फोटो व चलचित्रांची नवीनतम व आधुनिक प्रस्तुती करणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच एका आटोपशीर व नेटक्या एपीएस-सी कॅमेऱ्यामध्ये संक्षेपित केले गेले आहे.

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर, २०२३: सोनी इंडियाने आज एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला, अत्याधुनिक असा त्यांचा सर्वात नवीन α६७०० (ILCE-6700) कॅमेरा बाजारात आणण्याची घोषणा केली. फूल फ्रेम अल्फाटीएम आणि सिनेमा लाइन मालिकेच्या आधुनिक कॅमेऱ्यांमधील फोटो आणि व्हिडीओ टिपण्याची अग्रगण्य क्षमता आणि त्याचबरोबर α६७०० मालिकेतील कॅमेऱ्यांचा नेटका व आटोपशीरपणा आकार व वजनाने हलके असणे हे सर्व या नवीन कॅमेऱ्यामध्ये एकत्रित आल्याने सोनीचा हा α६७०० (ILCE-6700) आतापर्यंतचा सर्वात प्रगत असा एपीएस-सी मिररलेस कॅमेरा आहे. सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह २६.० प्रभावी मेगापिक्सेलचा एपीएस-सी बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (APS-C back-illuminated Exmor R® CMOS image sensor) यांना एकत्र करून α६७०० कॅमेरा  अपवादा‍त्मक अश्या अप्रतिम प्रतिमा टिपतो आणि त्याचबरोबर हा कॅमेरा वजनाने हलका व नेटका असल्याचा फायदाही वापरकर्त्याला मिळतो.

     १२०एफपीएस पर्यंत चित्रीकरण करणाऱ्या उच्च रिसोल्युशनच्या ४के  व्हिडिओंना हा कॅमेरा पूरक आहे. अवघड परिस्थितीमध्ये किंवा कमी उजेडामध्ये बारकाईने तपशील टिपण्यासाठी व्यापक अक्षांशाच्या १४पेक्षा जास्त स्टॉप्स यात असून या कॅमेऱ्यामध्ये एस-सिनेटोनटीएम (S-Cinetone™) पिक्चर प्रोफाइल आहे; जे कलर ग्रेडिंगची गरज नसलेले व त्रुटीविरहित, उत्कृष्ट मूव्ही इमेजरी मिळविण्यासाठी सोनीच्या खास व्यावसायिक सिनेमालाइनमध्ये असते. हे  माणसाच्या त्वचेच्या टोनचे अचंबित करणारी प्रस्तुती देते.

१.     आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्याची प्रतिमा टिपायची आहे ती वस्तू किंवा व्यक्ती अतिशय अचूकपणे ओळखते:

या कॅमेऱ्यामध्ये अतुलनीय अशा प्रतिमा मिळविण्यासाठी सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह नवीन एपीएस-सी (APS-C) आकार, अंदाजे २६.० प्रभावी मेगापिक्सेल असलेले बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (back-illuminated Exmor R® CMOS image sensor) आहे. स्थिर चित्र आणि चलचित्र या दोहोंसाठी स्टँडर्ड आयएसओ (ISO) संवेदनशीलता १०० पासून ते ३२,००० पर्यंत आहे, ज्यामुळे चित्रीकरणात उच्च संवेदनशीलता आणि आजूबाजूचा कमी गोंगाट येतो. समृद्ध रंगछटांमुळे झाडे आणि व्यक्ती जास्त नैसर्गिक रंगात चित्रित होतात.

२.     ४के१२०पी ला सुसंगत असलेला हा कॅमेरा उत्कृष्ट व्हिडीओ देतो:

जवळपास ६के एवढ्या डेटाचा वापर करून α६७०० कॅमेरा ४के १२०एफपीएसवर

उच्च फ्रेम रेटच्या चित्रीकरणासाठी अत्यंत उच्च दर्जाचे ४के व्हिडिओ प्रदान करतो. यामध्ये एस-लॉग३ वैशिष्ठ्य आहे. जे शानदार ग्रेडेशनसाठी १४+२ च्या वरील अक्षांश देते. याशिवाय, एस- सिनेटोनने सुसज्ज असलेला α६७०० कॅमेरा त्वचेच्या टोनचे चित्रण आणि सब्जेक्ट हायलाइटिंग उत्कृष्टपणे करतो.

३.     लहान नेटका आकार आणि कमी वजन यामुळे एक ठिकाणाहून दुसरीकडे नेणे, हाताळणे व जोडणे हे अद्वितीयपणे होते:

अतिशय नेटका आकार (अंदाजे ४ ७/८*२३/४*३ इंच आणि जवळपास १एलबी १.४oz वजन) असल्याने α६७०० कॅमेरा कोठेही सोबत घेऊन जाण्यास अत्यंत सोईस्कर आहे. यामध्ये वापरकर्त्यास अनुकूल असे टच करून वापरता येण्याजोगे व्हॅरी-अॅंगल एलसीडी मॉनिटर आणि सहज काम करता यावे म्हणून आधुनिक टच मेन्यू आहे.

किंमत आणि उपलब्धता:

α६७०० कॅमेरा संपूर्ण भारतभर सर्व सोनी कॅमेरा लॉन्जमध्ये, सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.

मॉडेलकिंमत (रुपयांमध्ये)उपलब्धता
ILCE-6700 (केवळ कॅमेरा)१३६,९९०/-२० नोव्हेंबर,२०२३ पासून
ILCE-6700L (कॅमेरा + 16–50 एमएम पॉवर झूम लेन्स)१४७,४९०/-२० नोव्हेंबर,२०२३ पासून
ILCE-6700M (कॅमेरा + 18–135 एमएम झूम लेन्स)१७२,९९०/-२० नोव्हेंबर,२०२३ पासून
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...