३ ते १६ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
पुणे -शहरातील -पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी ३ ऑक्टोंबर रोजी सायं. ५:०० वा. लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे येथे होणार असून या पुढील १० दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पुणेकरांसाठी विनामूल्य केले आहे. ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात देवीचे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे २१ वे वर्ष असून या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पुणे जिल्ह्यातील एकमेव दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम हे खास आकर्षण असणार आहे. बाल मित्रांनो बरोबरच मोठ्यांनी ही या कार्यक्रमाचे आकर्षण असते. याचबरोबर तरुणाईसाठी खास आकर्षण म्हणजे दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे.
पुणे लोकमान्य फेस्टिव्हलमध्ये नटले मी तुमच्यासाठी (लावणी), होम मिनिस्टर, सोलो डान्स आणि ग्रुप डान्स कॉम्पिटीशन, अहो ! नादच खुळा ( लावणी ), मॉ भगवती का दरबार, सुर संगम प्रेझेंट दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा, रावणदहन तसेच कोजागरी पौर्णिमानिमित्त चंदा रे चंदा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पुणे लोकमान्य फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते असून उत्सवाचे अध्यक्ष डॉ. नरेश महाले आणि संयोजक महेश महाले, शुभांगी सातपुते आदित्य सातपुते, गौरव सैटवाल, चेतन पाटील, रूशीकेश भोसले योगेश भोईर आहेत. पुणे लोकमान्य फेस्टिवल च्या सर्व ग्रुप डान्स मध्ये सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी
आदित्य सातपुते८८८८७३३८८६ गौरव सैटवाल ९७३०३८०९०२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ॲड. गणेश सातपुते यांनी केले आहे.