प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये जागतिक हृदय दिवस उत्साहात
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये जागतिक हृदय दिवस उत्साहात साजरा झाला. ‘कृतीसाठी हृदय वापर’ या संकल्पनेवर हृदयाचे आरोग्य याबाबतीत जनजागृती करण्यासाठी विशेष एरोबिक सत्राचे आयोजन केले होते.
परिणामकारक आरोग्य उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला. सहयोगी प्राध्यापक डॉ. सबिना हकीम यांच्या नेतृत्वात कार्डिओ वॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी (सीव्हीआरएस) विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सहायक प्राध्यापक डॉ. अंजली बैस यांनी विद्यार्थ्यांना एरोबिक्स व्यायामातून हृदयाचे आरोग्य कसे जपायचे याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर यांनी व्यायाम हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त, सुरक्षित व आनंददायक असल्याने नमूद केले.
उत्साही एरोबिक सत्रानंतर, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी चार्टवर अंगठ्याच्या ठशांसह हृदय रंगवले, हृदयाच्या आकाराचे सजावटी साहित्य तयार केले आणि सेल्फी बूथ्स उभारले. संस्थेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी हृदयाच्या आकारात उभे राहून एकतेचे व हृदयाच्या आरोग्याप्रती वचनबद्ध असल्याचे दाखवून दिले. सामूहिक छायाचित्रांतून आपण सर्व एक आहोत, अशी भावना प्रत्येकाने मनात रुजवली.
दातृत्व भाव व समाधानी मन आपल्याला तणावमुक्त ठेवण्यास मदत करत असते. ‘यूज हार्ट फॉर ऍक्शन’ या संदेशामागील उद्देश केवळ आपल्या हृदयाची काळजी घेणे इतकाच नाही, तर इतरांनाही निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा आहे. आज कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये कृतीतून हा संदेश दिला गेला. आपले हृदय कायम तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प सर्वानी केल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आनंदी जीवनशैली अंगिकारण्याची गरज आहे. हृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मात्र, अलीकडे आपण आरोग्याच्या बाबतीत सजग होत आहोत, ही चांगली गोष्ट आहे. सूर्यदत्त संस्थेने नेहमीच आरोग्यदायी शिक्षण देण्यावर भर दिला आहे. तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन दिले असून, येथे जिम, नियमित योगासने व अन्य व्यायाम करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे सूर्यदत्तचे विद्यार्थी कायम शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवतात.- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन