विनामूल्य ध्यान शिबिराचे आयोजन
पुणे-ध्यान के गुलिस्तान से सफल इंसान कैसे बनें मेरा उत्थान आवाहन या विषयावर सरश्रींच विनामूल्य शिबिराचे आयोजन २ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वा. मनन आश्रम, सिंहगड रोड येथे आयोजीत करण्यात आला आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे हे रौप्य महोत्सवी वर्ष सर्वांसाठी असणार आहे. कारण अनेक मोफत ऑनलाइन आणि ऑफलाइन ध्यान शिबिरे आणि नवीन, काही शिबिरे प्रत्येकासाठी सातत्याने आयोजित केली जात आहेत. याशिवाय, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी सरश्रींना ऐकण्याची आणि प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी देखील मिळणार आहे.
ध्यानामुळे गहन, आंतरिक शांतीचा अनुभव येतो, मानसिक समाधान मिळते. याशिवाय दैनंदिन तणाव, चिंता, भय यातून आपण मुक्त होऊन एकाग्रता, सजगता आपल्यात येते. अचूक निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिंगत होते, ध्यानाद्वारे जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून या कार्यक्रमाचा सर्वांनी आवश्यक लाभ घेऊन जीवन सार्थक करावे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून जास्तीतजास्त पुणेकरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.