पुणे, भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने पुण्यामध्ये ३,५०,९९३ कुटुंबे ब्रँड वारशाचा भाग बनल्याचा आनंद साजरा केला. पुण्यामध्ये तनिष्कच्या आजवरच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यनगरीमध्ये दशकांपूर्वी पदार्पण केलेल्या तनिष्कने अल्पावधीतच इथल्या चोखंदळ ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळवले, लहानसा समारंभ असो किंवा मोठा सोहळा, तो साजरा करण्यात तनिष्कने ग्राहकांची मनाजोगती साथ दिली. सुरुवातीपासून तनिष्क ब्रँडने आपल्या ग्राहकांसाठी असे अनुभव निर्माण करण्यावर भर दिला जे सोनेरी आठवणी बनून कायमचे मनावर कोरले जातील.
पुणेकर ग्राहकांकडून सातत्याने मिळत असलेला स्नेह आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तनिष्क ब्रँडने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तनिष्कचे मौल्यवान ग्राहक आणि त्यांनी ब्रँडसोबत मिळून निर्माण केलेला वारसा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी एक फॅशन शो करण्यात आला ज्यामध्ये तनिष्कचे शानदार दागिने परिधान करून तनिष्कच्या ग्राहकांनी रॅम्प वॉक केला. ग्लॅमर आणि शान यांनी चमचमत्या संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये ग्राहकांनी त्यांच्या अनोख्या कहाण्या, अनुभव आणि विशेष क्षण यांचे प्रतीक असलेले दागिने प्रदर्शित केले.
अतुलनीय कारीगरी, खास डिझाईन आणि गुणवत्तेप्रती बांधिलकी ही तनिष्कच्या उत्पादनांच्या सर्वोत्कृष्टतेची गुरुकिल्ली आहे. पारंपरिक कलात्मकता आणि आधुनिक शान यांचा मिलाप असलेले सर्वोत्तम दागिने तनिष्क सातत्याने प्रस्तुत केले आहेत. ग्राहकांच्या सन्मानार्थ ब्रँडने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये रिवाह बाय तनिष्क हा लग्नातील दागिन्यांचा खास सब-ब्रँड यावेळी पेश करण्यात आला, लग्नाचा अर्थात व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस अधिक खास व्हावा याची पुरेपूर काळजी रिवाहमध्ये घेण्यात आली आहे. पुणेरी नवरीला आवडतील आणि साजेसे ठरतील अशा दागिन्यांची विशाल श्रेणी रिवाहमध्ये उपलब्ध आहे. हळद, मेंदी या पारंपरिक कार्यक्रमांपासून, मौजमस्तीने भरपूर संगीत आणि रिसेप्शनपर्यंत प्रत्येक प्रसंगात साजेसे ठरतील असा नववधूचा संपूर्ण साज यामध्ये आहे. मुल्लई मोतु, ठुशी, पोल्का राणी हार, कोल्हापुरी साज, मोहनमाळ आणि मराठी वज्र टीक असे दागिने नववधूचा साज परिपूर्ण करतात.
या कलेक्शनला अनुरूप अशा नाजूक डिझाईनच्या स्टडेड बांगड्या देखील तनिष्कमध्ये आहेत. तोडे, शिंदेशाही तोडे, पाटल्या आणि पिचोडी असे विविध प्रकार नववधूची शान वाढवतात. परंपरेच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आधुनिकतेचा अप्रतिम मिलाप दर्शवणाऱ्या आधुनिक मंगळसूत्र डिझाइन्सचे डोर कलेक्शन यावेळी प्रस्तुत करण्यात आले. पुणेकर नववधुंनी पहिल्या पसंतीचा मान दिलेले हे कलेक्शन अनेकांच्या जीवनातील खास क्षणांचे साक्षीदार ठरले आहे.
टेल्स ऑफ ट्रॅडीशनमध्ये जडाऊ डिझाइन्स तनिष्कची अनोखी कारीगरी दर्शवतात, अनकट पोल्की, राजसी राजवाडा कुंदन नेकलेस शानदार आहेत, ओपन सेटिंग्समध्ये अनकट हिरे असलेले तेजस्वी चक्री दागिने डोळे दिपवतात. या कलेक्शनमध्ये आकर्षक मीनाकारी, इन्ले काम आणि उठावदार रंगांचे कॅल्सिडोनी दागिने देखील आहेत.
तनिष्कच्या बेस्ट ऑफ नॅचरल डायमंड्स कलेक्शनमध्ये पुण्यासाठी खास म्हणून तयार करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या श्रेणींमधील दागिने निवडून तब्बल १६३४४६ महिलांनी तनिष्कला पसंत केले आहे, याचा देखील आनंद यावेळी साजरा करण्यात आला. एथरियल वंडर्स या मनोहारी श्रेणीमध्ये ऍक्वामरीन, टांझानाईट, पेस्टल टूरमलाईन्स आणि दुर्मिळ सिट्रिन्स यासारख्या दुर्मिळ स्टोन्सचा वापर करून तनिष्कचे सर्वात खास कलेक्शन तयार करण्यात आले आहे. क्लासिक हाय ज्वेलरी श्रेणीमध्ये भव्यता दर्शवणारे दागिने आहेत. द एन्चेंटेड ट्रेल्स कलेक्शन, तनिष्कचे नवे कलेक्शन देखील या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. नदीच्या प्रवाहाचे अभिजात सौंदर्य, प्रकाश आणि पाण्याचा परस्परसंवाद, बहरलेल्या फुलांची मोहकता, फांद्यांची आकर्षक हालचाल आणि हिरव्यागार जंगलातील पानांची कुजबुज हे विविध घटक समाविष्ट करून, नैसर्गिक सौंदर्यातून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. निसर्गाच्या शांततेची कविता, निर्मळ प्रवाहांमधून सरकणाऱ्या बोटींचे नृत्य या कलेक्शनमध्ये दाखवण्यात आले आहे. हार्ट्स अँड ऍरोज कलेक्शनमध्ये कानातले, अंगठ्या आणि सॉलिटेअर स्ट्रिंगमध्ये उत्तम प्रकारचे कट डायमंड सॉलिटेअर्स प्रस्तुत केले आहेत, ज्यांनी पुणेकर ग्राहकांना जीवनातील खास क्षण साजरे करण्यासाठी अतुलनीय तेज प्रदान केले आहे.
तनिष्कने हा महत्त्वाचा टप्पा साजरा करत असताना, पुणेकर ग्राहकांनी ब्रँडला दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या ब्रँडचा वारसा गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहकांसोबत निर्माण झालेल्या चिरस्थायी नातेसंबंधांच्या पायावर बांधला गेला आहे. ज्यांनी तनिष्कवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवला आहे ते विविध वयोगटातील ग्राहक तनिष्कच्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वाचा भाग बनले आहेत.
टायटन कंपनी लिमिटेडचे तनिष्कचे कॅटेगरी, मार्केटिंग आणि रिटेलचे व्हीपी श्री अरुण नारायण यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले, “३,५०,९९३ पुणेकर कुटुंबे आमच्या परिवाराचा भाग बनल्याचा आनंद आणि महत्त्वाचा टप्पा साजरा करताना, अभिमानाबरोबरीनेच कृतज्ञतेने आमचा ऊर भरून आला आहे. तुमच्या जीवनातील सर्वात चांगल्या क्षणांमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो, नववधूंसाठी आयुष्यभराच्या सोनेरी आठवणी निर्माण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मिळवलेले यश तुमच्या विश्वासावर आधारलेले आहे. उत्कृष्टता, कारीगरी आणि तुमच्या कहाण्या सांगणारे दागिने निर्माण करण्याचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अतुलनीय गुणवत्ता, सेवा आणि संस्मरणीय अनुभव सातत्याने प्रदान करत राहू हे आमचे वचन आहे. आम्हाला तुमच्या आयुष्याचा आणि कुटुंबाचा सोनेरी भाग बनवल्याबद्दल मनःपूर्वक आभार, पुणे!”