पुणे: थोर अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभियंता दिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्येही अभियंता दिनाचे औचित्य साधून ‘प्रौद्योगिक : शाश्वतता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाश्वततेचे प्रतीक असलेल्या ‘प्रौद्योगिक’ संकल्पनेअंतर्गत अभियांत्रिकी क्षेत्रातील नावीन्य, सहयोग आणि उत्कृष्ट योगदान साजरे करण्याचा या विशेष कार्यक्रमाचा उद्देश होता. शनिवार (दि. १४) व रविवार (दि. १५) या दोन दिवसांच्या उत्सवात हॅकेथॉन स्पर्धा, इनोव्हेशन फेअर, उद्योजकता स्पर्धा, मजेदार शैक्षणिक खेळ, पोस्टर स्पर्धा, ‘आलसी इंजिनिअर’ वर चर्चासत्र आणि अनुभवकथन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
भारत फोर्जचे वरिष्ठ व्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोश डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्सचे टेक लीड अविनाश कुमार तिवारी, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख मनमोहन भूमकर, फाउंडेशन फॉर मेकइटहॅपन सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेंशन अँड इन्क्युबेशनचे (एफएमसीआयआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर तलाठी, हेलिक्स इंटिग्रेटेड लर्निंगचे संस्थापक नाथाजी शेळके, अभियंता विवेक सलवारू, मायक्रोपॉइंट कॉम्प्युटर्सचे राहुल चौधरी आणि श्री दीपक नारखेडे यांच्यासह एआय, क्लाउड कम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
अभियंता दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांत मॉक प्लेसमेंटमध्ये राजकन्या पाटील (प्रथम), वैष्णवी लष्करे (द्वितीय), प्रथमेश काटे (तृतीय), हॅकेथॉन स्पर्धेत वैभव काळे (प्रथम), ज्ञानेश्वरी थोरवे (द्वितीय), तन्वी घोलप (तृतीय), इनोव्हेशन फेअर आणि उद्योजकता यामध्ये प्रसाद काकडे (प्रथम), तन्मय बामदाळे (द्वितीय), पल्लवी शिंदे (तृतीय), पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये वैष्णवी बिरादार (प्रथम), शिवानी देशमुख (द्वितीय), वैष्णवी हर्ले (तृतीय) यांनी यश संपादन केले.
समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजिला होता. विश्वस्त रत्नाकर मते, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, इंजिनिअरिंग क्लबचे प्रमुख माजी विद्यार्थी सुनील चोरे, माजी विद्यार्थी प्रा. सचिन जायभाये, गणेश चव्हाण, अभियांत्रिकी क्लब समन्वयक आकाश दुबे, क्लब प्रमुख साश्वती कुलकर्णी (सुमित्रासदन), अंशु कुमारी (डॉ. आपटे वसतिगृह), रोहित गोरे (लजपतराय विद्यार्थी भवन) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.