पुणे : पुण्याच्या वडगाव शेरी भागातील मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण ८ अग्निशमन वाहने दाखल झाली असून जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागली आहे. एकुण पाच दुकानांना आग लागली असून पत्र्याची दुकाने आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाची ८ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.