यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून बँकॉकसाठी आणि दुबई साठी विमान सेवा सुरु होते आहे .केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ! पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बॅंकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
पुणे ते बँकॉक दरम्यान पूर्वी विमानसेवा सुरू होती. मात्र कोविडच्या सुरवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सेवा बंद झाली. त्यावेळी बँकॉकची सेवादेखील बंद झाली. ती अद्याप सुरू झालेली नाही. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्याने यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. यात पुणे ते बँकॉक विमानसेवेचा देखील समावेश असण्याची शक्यता अधिक आहे
सध्या दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे
पुणे विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू आहेत. यात दुबई व सिंगापूरचा समावेश आहे. बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यावर पुण्याहून थायलंड हा देश जोडला जाईल. यानिमित्ताने तिसरा देश पुण्याला जोडला जाईल. यामुळे पुण्याची कनेकटव्हीटी वाढण्यास मदत होईल.
दैनंदिन ९५ विमानांचे उड्डाण
- पुण्याहून दोन्ही टर्मिनल मिळून सध्या सुमारे १९० विमानांची वाहतूक होत आहे
- यात दैनंदिन सरासरी ९५ विमानांचे उड्डाण व ९५ विमानांचे लँडिंग होते
- प्रवासी संख्या : सरासरी ३५ हजार (दैनंदिन)
पुण्याहून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्लॉटबद्दल विचारणा झाली आहे. पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्ध होत असल्याचे संबंधित विमान कंपनीला कळविले आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे