पुणे – नैशा रेवसकर या पुण्याच्या खेळाडूने हिमाचल प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक पटकाविले.
अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश टेबल टेनिस संघटनेने कांगरा येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. नैशा हिला अंतिम फेरीत दिव्यांशी भौमिक हिच्याकडून ४-११,८-११,२-११ असा तीन गेम्स मध्ये पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत नैशा हिने आरुषी नंदी हिच्यावर ६-११,११-९,११-९,११-६ अशी मात केली होती तर उपांत्यपूर्व फेरीत तिने प्रीती पॉल हिचा चुरशीच्या लढतीनंतर १३-११, ११-६,१०-१२,४-११,११-९ असा पराभव केला होता.
नैशा हिला रौप्यपदकाबरोबरच अकरा हजार दोनशे रुपयांचे पारितोषिकही मिळाले. ती एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आजपर्यंत तिने जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले आहे.