कॅब चालकांच्या  मागण्या पूर्ण न झाल्यास कुटुंबासह मुंबई मंत्रालयावर मोर्चा

Date:

 माँसाहेब कॅब संस्थेच्या वतीने निवेदन ; मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजू सेठी आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मागितला ८ दिवसांचा कालावधी
पुणे : बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या बलाढ्य कॅब कंपन्यांवर कारवाई करावी आणि खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅबचे दर पत्रक अमलात आणावे, या मागणीसाठी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मंत्रालयावर ९ हजार चालक आणि मालक यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजू सेठी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुटुंबासह मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढू, असे माँसाहेब कॅब संस्थेच्या वर्षा शिंदे पाटील यांनी सांगून यासंदर्भात निवेदन दिले आहे.तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन देण्यात आले. 

वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब विषयी रेट कार्ड जाहीर झालेले आहे. ७ ते ८ महिने होऊन सुद्धा या जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार ओला, उबर व तत्सम एप्लीकेशन वर आधारित कंपन्यांनी दर अमलात आणले नाहीत. हे दरपत्रक पुणे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक अ‍ॅप कंपन्यांना लागू करण्यात यावेत आणि पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सवारी कॅब, गोजो कॅब, टॅक्सी बाजार, कॅब बाजार, इन ड्राईव्ह, ब्ला ब्ला कार्स, वनवे कॅब, रॅपिडो, ई – कॅब, एव्हरेस्ट फ्लीट या बेकायदेशीर चालू असलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी.

पुणे जिल्ह्यामध्ये वाकड नाशिक फाटा, चांदणी चौक, पुणे स्टेशन, नवले ब्रिज अशा ठिकाणी मुंबई पुणे प्रवासासाठी अवैधरित्या प्रवासी वाहतूक बेकायदेशीरपणे चालत आहे. प्रवासी एप्लीकेशन वर आधारित कंपन्या यांच्या आधारे ही वाहतूक केली जात आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

एव्हरेस्ट फ्लीट सारख्या बलाढ्य कंपन्या पुण्यामध्ये तीन ते चार हजार गाड्या घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे गरीब कष्टकरी चालक आणि मालक यांना उदरनिर्वाह करणे देखील अशक्य झाले आहे. तरीही या विषयांमध्ये प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...