पिंपरी चिंचवड शहर पोलीस आणि मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरीच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहरात राबवला जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह
पुणे- : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस व मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे. या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस उपयुक्त श्री बापू बांगर उपस्थित होते.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपयुक्त श्री बापू बांगर यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले, तसेच या मोहिमेद्वारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या सुरक्षित वाहतुक अभियानाची मोलाची मदत होईल. हे अभियान पिंपरी चिंचवडला अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे,” असे प्रतिपादन केले.
मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरीचे केंद्र प्रमुख डॉ व्यास मौर्य यांनीही हॉस्पिटलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला ते म्हणाले ” मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी नागरिकांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कायम तत्पर आहे. आम्हाला विश्वास आहे की, आरोग्य आणि सुरक्षितता एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, आणि हे अभियान आमच्या शहरात एकूण सुरक्षिततेत योगदान देण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे,”
सुरक्षित वाहतूक मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि वाहनचालक आणि पादचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश असेल. पिंपरी चिंचवड पोलीस आणि मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश शहरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कार्य करतील. मेडिकव्हर हॉस्पिटल चे कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीसवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.