पुणे- पुण्याचा गणेश उत्सव जागतिक स्तरावर नावाजला जातो . कला, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या या उत्सवांत पोलिसांनी प्रतीबंधात्मक कारवाई म्हणून ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १० दिवस दारूची दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आणि तीही महत्वाच्या भागातील असल्याने गणेशोत्सवात तळीरामांची पंचायत तर होणार आहेच पण पोलिसांच्या मते यामुळे कलह कमी होऊ शकणार आहे .
फरासखाना , विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारू विक्रीची दुकाने आणि हॉटेल परमिट रूम दिनांक ७ ते १७ सप्टेंबर अखेर पर्यंत बंद ठेवण्याचा हा प्रस्ताव आहे . असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागा ने फरासखाना , विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारू विक्रीची दुकाने आणि हॉटेल परमिट रूम दिनांक ७ ते १७ सप्टेंबर अखेर पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे