Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान

Date:

पुणे, दि. ३ सप्टेंबर, २०२४ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबई येथील विधानभवनामधील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राज्य सरकारच्या राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने २०२१-२२ या वर्षातील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी शिरोळे यांची निवड करण्यात आली होती.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध प्रश्न मांडत असतांनाच राज्यातीलही अनेक विषय सभागृहात प्रभावीपणे मांडले होते. समस्या मांडत असतांनाच त्या सोडवण्यासाठीच्या सूचना करीत सभागृहात छाप पाडणार्या शिरोळे यांना उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान करीत गौरवण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक सभागृहात प्रभावी मांडणी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...