Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह ७६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Date:

पुणे, दि.१: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात आदरवाडी गावाच्या हद्दीत, हॉटेल शैलेश समोरील पौड- माणगाव रस्त्यावर केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवा राज्य निर्मीत व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरीता परवानगी असलेल्या पोलंड प्राईड प्रिमियम कलेक्शन रिझर्व्ह  व्ह‍िस्की या ब्रॅण्डच्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ३३ हजार ६०० सीलबंद बाटल्या (७०० बॉक्स ) वाहनात मिळून आल्या. मद्याची वाहतूक करण्याकरीता वापरलेला टाटा मोटर्स कंपनीचा तपकिरी रंगाचा सहाचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच-०३- डीव्ही ३७१६ व मोबाईल फोन असा अंदाजे ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यामध्ये वाहन चालक जुल्फेकार ऊर्फ जुल्फेकार ताजअली चौधरी (वय ५० वर्षे) रा. हाऊस नं. २०४, मोहल्ला नाली पाडा, मसूरी डासना आर. एस. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश यास जागीच अटक करून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक विराज माने, अतुल पाटील, धीरज सस्ते, जवान  प्रताप कदम, सतिश पोंधे, अनिल थोरात, शशीकांत भाट, राहुल ताराळकर, महिला जवान उषा वारे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विराज माने करत आहेत, अशी माहिती पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...

त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली….

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य...