पुणे- रेल्वे स्टेशनवर तिकीट मिळवणे , कन्फर्म तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना हेरून त्यांना ऑनलाईन तिकीट काढून देतो सांगून रेल्वे स्टेशन बाहेर नेऊन त्यांना मारहाण करून रोख रकमेसह ,पासवर्ड सह एटीएम कार्ड, मोबाईल फोन पळवून लाखोची लुट करणाऱ्या लुटारूंपासून लोकांनी सावध राहायला हवे . नुकतेच अशा २ लुटारूंनी २१ वर्षाच्या तरुणाला मारहाण करून ३ लाखाला लुटल्याची घटना घडली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल झाली आहे. २१ वर्षे वयाच्या तरुणाने हि फिर्याद दाखल केली आहे. तो वडील आजारी असल्याने बिहारला माघारी जाण्याच्या प्रयत्नात असताना दि.२५/०८/२०२४ रोजी सांय. १७/१५ वा.चे. दरम्यान त्याला रेल्वे स्टेशनवर दोघांनी गाठले ऑनलाईन तिकीट काढून देतो असे सांगुन दोन लुटारूंनी डुल्या मारुती मंदिरासमोर गणेश पेठ पुणे येथे त्याला घेवुन जावुन त्यांचे बँकेचा पासवर्ड मागितला असता तो फिर्यादी यांनी न दिल्याने त्यांना मारहाण करुन, शिवीगाळ करुन, फिर्यादी याचे बँक खात्याचा पासवर्ड घेवून फिर्यादी याच्या खिशातील पाकीट काढून त्यातील ए टी एम कार्ड, आधारकार्ड व रोख रक्कम २०,०००/- रु. घेवुन पळुन गेले व त्यानंतर फिर्यादी यांचे बँक खातेतुन २,६३,८००/- रु. काढुन घेतले . फौजदार अरविंद शिंदे मो.नं ९२८४११८०१८ या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेत आहेत .