पुणे-यावेळी पुणे महापालिकेने आपला आपत्ती व्यवस्थापनाचा विभाग आणि अन्य विभागांना देखील पावसाच्या वाढत्या जोरामुळे नागरिकांच्या अपेष्टा आणि नुकसान टाळण्यासाठी सज्ज ठेवले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे . या स्नाद्र्भात महापालिकेने म्हटले आहेकी,’दिनांक २४/८/२०२४ रोजी पुणे शहरातील घाट परिसरामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्या दृष्टिकोनातून पुणे मनपा कार्यक्षेत्रामध्ये महापालिका आयुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये उपआयुक्त, खातेप्रमुख, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक १ ते ५, मा.महापालिका सहायक आयुक्त, १५ क्षेत्रीय कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशामक दल हे कार्यरत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग आणि पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे कायम संपर्कात होते. त्यानंतर खडकवासला धरणामधून २००० क्युसेक पाणी सोडणार आहे अशी पूर्व सूचना मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा तयार करण्यात आली. पुणे शहरांमधील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तो विसर्ग रात्री ३५००० क्युसेक पर्यंत करण्यात आला. त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे बाधित होणारी ठिकाणे व नदीपात्रामधील जो भाग आहे , त्या ठिकाणी गाड्या पार्क करू नये, जनावरे बांधण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. पुणे मनपाने ४१ बाधित ठिकाणी जिथे पूर येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांच्या जवळील शाळा, हॉल नागरिकांना सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत. अशा नागरिकांकरता जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्याकरता पथके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छची टीम तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम तयार करण्यात आलेली आहे. तसेच एकता नगर, पाटील,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरामधील सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. ११००० ते १५००० क्युसेक पाणी सोडल्यानंतर शिवणे पूल बंद करण्यात येतो. १५००० ते १८००० क्युसेक पाणी सोडल्यानंतर भिडे पूल बंद करण्यात येतो, व ३२००० क्युसेकच्या पुढे पाण्याचा विसर्ग केल्यास टिळक पूल बंद करण्यात येतो. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांकरता सर्व प्रकारच्या उपायोजना करण्याकरिता पुणे मनपा प्रशासन सज्ज आहे. तसेच NDRF, ARMY व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याबरोबर कायम समन्वय साधण्यात येत आहे. मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक ०२०-२५५०१२६९, ०२०- २५५०६८०० या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा असे आवाहन पुणे मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे व पुणे मनपा नियंत्रण कक्षात २४ तास एक उपायुक्त यांची देखील सर्व नियंत्रणा करिता नेमणूक करण्यात आलेली आहे.