जळगाव-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशीही ते संवाद साधतील. यावेळी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र स्वत: एकनाथ खडसेंनीच याला पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे.तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदींकडून जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन घोषणा केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कार्यक्रमाला जाणार नाही- खडसे-शासकीय कार्यक्रम असल्याने सर्व आमदारांना निमंत्रण देणे बंधनकारक होते, पण मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही. वेळेत निमंत्रण मिळाले असते तरी मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.