मुंबई,दि.२१: समाज माध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली यामध्येसुद्धा ग्रंथालयाचे महत्त्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचन संस्कृती ही ग्रंथालयामुळेच टिकून असल्याचे सांगून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे पार पडला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ग्रंथालयांना आर्थिक सहाय्य योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर नवीन पिढी ग्रंथालयाकडे जात नसेल तर नवनवीन प्रयोग करून त्यांच्यापर्यंत ग्रंथालय आणणे गरजेचे आहे. फिरते वाचनालय, ई वाचनालय अशा विविध पद्धतीने लोकांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय संचालनालय काम करत आहे. सर्वांनी मिळून ग्रंथालय वाचनालयाचा आत्मा समजून घेऊन ग्रंथालयाची चळवळ विकसित करण्याची गरज आहे. असे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुरस्कार सोहळ्या दरम्यान सर्वांना संबोधित केले.
या पुरस्कार समारंभावेळी बोलताना प्रधान सचिव, विकास चंद्र रस्तोगी म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ खूप मोठी आहे. ही चळवळ अधिक मोठी होऊन वाचकांना अधिक चांगली सेवा चळवळी मार्फत देण्यात यावी. ग्रंथालयाच्या आस्थापनांनी ग्रंथालयाचा वापर वाढविण्यााठी प्रयत्न करावेत. यातही आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पिढीची आवड ओळखून काम करावे. पुस्तके सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल तसेच ई-लायब्ररी करण्याकडे अधिक भर देण्यात यावा. ग्रंथालयातील पुस्तके, सोयीसुविधा आणि परिसर यात सुधारणा कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग
१) हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)
२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, नांदुरा, श्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, बुलढाणा रोड, नांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)
ग्रामीण विभाग :
(अ) १) शहीद भगतसिंग वाचनालय, कुऱ्हा, मु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)
(आ) संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी जि. वर्धा (७५ हजार रु.)
(इ) कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)
(ई) कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय, बिरोबा मंदिराजवळ, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ( २५ हजार रु.)
(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)
राज्यस्तरीय पुरस्कार
१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
श्री. विनायक दत्तात्रय गोखले, अनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे
२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
श्री. सुरेश बळीराम जोशी, ग्रंथपाल, विजय वाचनालय, ता. तुळजापूर जि. धाराशिव
डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. २५ हजार प्रत्येकी) :
१) अमरावती – श्री. विनोद बाळकृष्ण मुंदे, श्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालय, राजना पो. काजना ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती
२) छत्रपती संभाजीनगर – श्री. युवराज मोहनराव जाधव, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय, शिवणी (खुर्द), पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर
३) नागपूर – श्री. धनराज देवीलाल रहांगडाले, श्री. शारदा वाचनालय, गोंदिया जि. गोंदिया
४) नाशिक – श्री. गोपीचंद जगन्नाथ पगारे, मातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, जेल रोड, नाशिक जि. नाशिक
५) पुणे – श्रीमती ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकर, श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा जि. सातारा
६) मुंबई – श्री. अनंत आपाजी वैद्य, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. २५ हजार प्रत्येकी) :
१) अमरावती – श्रीमती ज्योती रामदास सरदार (धबाले), ग्रंथपाल, साने गुरुजी वाचनालय, जठार पेठ, अकोला, जि. अकोला
२) छत्रपती संभाजीनगर – श्री. गणेश रामभाऊ शेंडगे, ग्रंथपाल, ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय, ता. जि. बीड
३) नागपूर – श्री. नंदू दामोदर बनसोड, ग्रंथपाल, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय, महाल, ता.जि. नागपूर
४) नाशिक – श्री. अमोल संभाजी इथापे, ग्रंथपाल अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर जि. अहमदनगर
५) पुणे – श्री. भगवान पांडुरंग शेवडे, ग्रंथपाल श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, ता.शिराळा, जि. सांगली
६) मुंबई – श्रीमती मंजिरी अनिल वैद्य, ग्रंथपाल, श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले (पूर्व) मुंबई.
००००
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/
Related Articles
-
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह व भाजपा विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
-
परदेशात राहणाऱ्या पुणेकरांना आपत्कालीन सहकार्यासाठी पुण्यातील गणेश मंडळांची “मोरया हेल्पलाईन”
-
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन