उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या घरी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा..!
पुणे, १९ ऑगस्ट – आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपले बंधू उद्योजक श्री. मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील सिल्वर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला.याप्रसंगी सौ.अपर्णा पाठक उपस्थित होत्या.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
याबरोबरच नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, यश, शांती, नवचैतन्य घेऊन येवो अशा सदिच्छा यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
नुकताच राज्य स्तरावर लाडकी बहिण सन्मान योजना शुभारंभ झाला असून, अनेक लक्षावधी महिलांना त्यांचा फायदा मिळालेला आहे. आणि अजूनही कोट्यवधी महिलांना त्याचा फायदा मिळेल. असा विश्वास यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
महिलांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊल आहे.असे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.ज्या एकल महिला आहेत ज्यांना पती किंवा भावाचा आधार नाही अशा महिलांना ही योजना दिलासा देणारी असल्याचं, यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विरोधक या योजनेवर टीका करत आहे, की या सरकारचं काय होईल. पण याआधी अनेक योजनांमध्ये ज्यांनी कोट्यावधीची भ्रष्टाचार केला आहे, जे राष्ट्रवादी, काँग्रेसचे पक्षातील जे अनेक नेते तुरुंगात जाऊन आलेले आहेत. तेच जनतेची दिशाभूल करून आपल्या माता बघीनींचा सरकारवरचा विश्वास उडावा याकरिता प्रयत्न करीत आहेत. असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले.