पुणे. दि. १५ ऑगस्ट. द हिंद फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २९ आणि मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ / पर्वती मधील महिला आणि युवतींसाठी मोफत प्रोफेशनल हेअर स्टाईल, प्रोफेशनल साडी ड्रेपिंग आणि प्रोफेशनल मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार ८ ऑगस्ट २०२४ ते सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी रोज दोन तास या प्रमाणे सहा बॅच मध्ये सलग चार दिवस हे प्रशिक्षण देण्यात आले.
द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने महिलासाठी वर्षभर असे स्वयंरोजगार निर्मिती चे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात. ब्युटी पार्लर बेसिक, ब्युटी पार्लर ऍडव्हान्स, शिलाई काम , प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, केक प्रशिक्षण वर्ग, फॅशन डिझाईनिंग, रांगोळी तसेच महिलासाठी वूमेन्स फिजिक बॉडीबिल्डिंग स्पर्धा असे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
प्रोफेशनल हेअर स्टाईल कोर्स मध्ये सर्व प्रकारच्या हेअर स्टाईल प्रत्यक्ष करून दाखऊन महिलांकडून करून हि घेण्यात आल्या. कोणते साहित्य लागते, यासाठी कोणते साहित्य कुठे मिळते, साहित्य वापरायचे कसे कोणते साहित्य वापरायचे जेणेकरून गिराइक आल्याकडेच येईल याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रोफेशनल मेहंदी प्रशिक्षण वर्गात मेहंदी चे सर्व प्रकार शिकऊन, मेहंदी कोन करण्यासाठी मेहंदी कशी तयार करायची, मेहंदी बनवताना कोणत्या कोणत्या वस्तू घालायच्या, जेणे करून मेहंदीचा रंग चांगला उठून येईल, मेहंदी डिझाईन सुंदर दिसेल, मेहंदी कोन कसा बनवायचा, रॉ मटेरियल कोठून आणायचे, आपले मार्केट कसे मिळवायचे, सर्व प्रकारचे मेहंदी प्रकार, मेहंदीचे कोण प्रकार शिकवण्यात आले.
प्रोफेशनल साडी ड्रेपिंग कोर्स मध्ये साडीचे पंचेचाळीस प्रकार प्रशिक्षण वर्गात शिकवण्यात आले.
सहावरी साडी चे विविध प्रकारा सह बंगाली साडी, ब्राह्मनी साडी, साऊथ इंडियन साडी, कोंकणी साडी, नववारी साडी चे विविध प्रकार, जीन्स वरची साडी, आसामी साडी असे विविध प्रकार शिकवण्यात आले. साडी चे जवळपास ४५ प्रकार, डेमोसह शिकवण्यात आले. साडीचा पदर, साडीच्या बूट्ट्या अंगावरच कशा करायच्या या पासून ते साडी कशी घालायची, कोणत्या प्रकारला कोणती साडी वापरायची साडी ड्रेपिंग साठी कस्टमर कसा मिळवायचा आपली जाहिरात कशी करायची, साडी ड्रेपिंग यासाठी लागणारे साहित्य मार्केट मधून कोठून घेईचे असे सर्व प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.
साडी ड्रेपिंग साठी प्रोफेशनल मॉडेल वर साडी ड्रेपिंग करून दाखवण्यात आले.या तीनही प्रशिक्षण वर्गात लागणारे सर्व साहित्य संयोजकाचे वतीने मोफतच देण्यात आले होते.
पूनम रासकर, सुहास साठे, निकिता आढाव, मृणाल शिंदे, पदमा डांगरे या अनुभवी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट यांनी प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षिण दिले.
कार्यक्रमाचे संयोजक मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव आणि जयश्री धनंजय जाधव यांनी केले होते.
हा प्रशिक्षण वर्ग उपक्रम संपन्न होण्यासाठी संध्या निकम, सीमा शिंदे, सुरेखा कलशेट्टी, मालती शिंदे, निलम चव्हाण , लता पाटोळे, नीता भिसे, वनिता सोपे, राधिका ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले.