स्वातंत्र्यदिनानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम
पुणे-भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा मतदारसंघामधील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हिलचेअर आणि वॉकरचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष संदीप बुटाला यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आज 15 ऑगस्ट देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघात ही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि समुत्कर्ष सोशल फाउंडेशन आणि पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हिलचेअर आणि वॉकरचे वाटप करण्यात आले.