वेदाच्या रोमँटिक ट्रॅक ‘जरूरत से ज्यादा’ मध्ये जॉन आणि तमन्ना ची खास जोडी दिसणार !
वेदाचे नवीन गाण ‘जरूरत से ज्यादा’ ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम सोबत दिसणार आहेत. अमाल मलिकने अरिजित सिंगच्या मनमोहक गायनाने संगीतबद्ध केलेला हा रोमँटिक ट्रक नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. कुणाल वर्मा यांनी लिहिलेले हे गाणं ” वेदा ” मधल खास गाणं ठरणार असून तमन्ना आणि जॉन यांची जुगबंदी यातून अनुभवयाला मिळणार आहे.
तमन्नाचे चाहते जॉनसोबतच्या तिच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रशंसा करतात तर १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात या दोघांना एकत्र बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. गाण्याबद्दल बोलताना जॉन अब्राहम म्हणाला “जरूरत से ज्यादा ” मध्ये माझी भावनिक आणि रोमँटिक बाजू दिसणार आहे तमन्ना सोबत हे गाणं करताना खरंच मज्जा आली आहे ” तमन्ना भाटिया म्हणाली “पहिल्यांदा जॉनसोबत काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलो आहोत आणि आमची केमिस्ट्री आणखी खास बनली! हे गाणे प्रेम आणि आठवणींनी भरलेला मनापासूनचा प्रवास आहे आणि मला विश्वास आहे की हे गाण सगळ्यांना नक्की आवडेल. निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि असीम अरोरा लिखित ” वेदा ” ची निर्मिती झी स्टुडिओज, उमेश केआर बन्सल, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, जॉन अब्राहम आणि मिन्नाक्षी दास यांनी केली आहे. 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.