पुणे, ३१ जुलैः कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेतर्फे ‘ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर.’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत ‘२००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व आर्ट गॅलरी, पुणे येथे २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत राहणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक तेजाली शहासने यांनी दिली.
या प्रदर्शनीचे उद्घाटन २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वा. होणार आहे. या प्रसंगी साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, समाजसेवक जयंत जस्ते, भाषातज्ज्ञ संदीप नुलकर, वंदे मातरम संशोधक मिलिंद सबनीस, किशोर मासिकचे कार्य. संपादक किरण केंद्रे, न्यू इंग्लिश स्कूलचे चे पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, रमणबाग प्रशालाच्या मुख्याध्यापिका चारूलता प्रभूदेसाई उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय वीरामात, वीरकन्या, वीरपुत्र व सेनादलातील माजी सैनिक योद्धे यांची उपस्थिती राहील.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, अँड नंदिनी शहासने व सौ. मंजिरी शहासने यांनी शहारातील सर्व शाळांना आवाहन केले की त्यांनी विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी दाखवावी. त्यांच्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून ही प्रदर्शनी दाखविण्यात येईल. तसेच शहरातील सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा.