पुणे-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या “महाआरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप” उपक्रमाचा हजारो नागरिकांनी सहभाग घेतला व आरोग्य शिबिराचा तसेच मोफत चष्म्याचा लाभ घेतला.
सोमवार दि.२२ जुलै २०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजेपासून दिवसभर आई माता चौक,मार्केट यार्ड,अप्पर इंदिरा नगर,संविधान चौक, बिबेवाडी, गजानन महाराज चौक, पर्वती, ई लर्निग स्कूल, पर्वती दर्शन, दांडेकर पूल, जनता वसाहत, सांस्कृतिक भवन पुष्प मंगल कार्यालय, बिबेवाडी कॉर्नर या विविध केंद्रांवर सुरू असलेल्या या महाआरोग्य शिबिरास भर पावसात देखील पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक उपक्रमामध्ये व शासकीय योजनांमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. नागरिकांची सेवा होईल, नागरिकांना उपयोगी पडतील अशा अनेक योजना राबविल्या. आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना देखील अशाच प्रकारे लोककल्याणकारी उपक्रम राबवावा, अशी माझी संकल्पना होती आणि या आरोग्य शिबिरास मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे खऱ्या अर्थाने देवेंद्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवू शकलो, याचे मला मनस्वी समाधान आहे, असे मत यावेळी .श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केले.