पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित झालं आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतातील हवाई वाहतूक क्षेत्राने मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर ही वाहतूक सेवा पोचली असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नव्या टर्मिनल वरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत देशात 469 नवीन हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली, बंगळूर आणि अयोध्या यासारख्या विमानतळावर नवीन टर्मिनल उभी राहिली आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात देशभरात आणखी 20 ते 25 नवीन विमानतळांची उभारणी केली जाणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नव्या टर्मिनल मुळे वर्षाला सुमारे 90 लाख ते 1 कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक इथून करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या टर्मिनल मधील सर्व सेवा लवकरच नव्या टर्मिनल मधून उपलब्ध करून दिल्या जातील असे मोहोळ यावेळी म्हणाले.पुण्यातील विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुरे पडणारे जुने टर्मिनल लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर या नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली असून पुण्याची संस्कृती आणि समृध्द परंपरा यांचे दर्शन या वास्तु मधून घडेल अशा पद्धतीने ते सजवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने 10 मार्च 24 रोजी या टर्मिनलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून आज हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित झाले आहे.
पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित झालं आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु झालं आहे. नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्थांसह या विमानतळाला ६ बोर्डिंग गेट निर्माण करण्यात आले आहेत. एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळत आहे.
पुणेकर प्रतिक्षेत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यान्वित झालं आहे.आज रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू झालं आहे.पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केलेली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला होता.
महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे.
कसे आहे नवीन टर्मिनल?
एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख
वाहनतळ क्षमता : 1 हजार मोटारी
प्रवासी लिफ्ट : 15
सरकते जिने : 8
चेक-इन काऊंटर : 34
एकूण खर्च – 475 कोटी रुपये
व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता
भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 52 हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता आहे.