पुणे-कधी होणार 24 बाय 7 पाणी योजना आणि मुळा-मुठा नदीसुधार पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण असे सवाल येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना काल केले . भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या दोन्ही बाबींचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे या पार्श्वभूमीवर लोकांना दिलेली आश्वासने तरी झटपट पूर्ण व्हावीत या दृष्टीने मोहोळ यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांची कान उघडणी करण्याचे काम सुरु केले आहे
मोहोळ यांनी म्हटले आहेकी,’ पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचा आज पुणे महापालिकेत बैठक घेत सविस्तर आढावा घेतला. महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांच्यासह विभागप्रमुखांच्या उपस्थितीत हा आढावा घेतला. पुण्यातील मुळा-मुठा नदीचे रुप पालटून टाकणाऱ्या नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सुरु असून याला गती देण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवाय पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पुढील 50 वर्षांच्या विचार करुन साकारत असलेल्या 24X7 समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच पुणे शहरात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित उड्डाण पुलांच्या कामांची माहितीही घेतली. महत्त्वाचे म्हणजे पूर व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडून आपण 200 कोटींचा विशेष निधी मिळवला असून त्या निधीतून नियोजित कामांची माहिती घेतली. आंबिल ओढ्यासाठी संरक्षण भिंती बांधल्या जात आहेत. सदरील कामे वेळेत करण्यासंदर्भात सूचना केली. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून याबाबत लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे, या विषयावरही चर्चा केली. तसेच कर्वे नगर ते सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या मुठा नदीवरील पुलाच्या कामाचा आढावाही घेतला.