पंतप्रधान मोदी 5 वर्षानंतर रशियाला पोहोचले आहेत. मॉस्को येथील वनुकोवो-2 आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. यावेळी रशियन सैन्याने भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवली.
यानंतर पीएम मोदी कार्लटन हॉटेलमध्ये पोहोचले. जेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. मोदी उद्या 22व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. याआधी मोदी आज पुतिन यांच्यासोबत खाजगी डिनर करणार आहेत.
युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदींची रशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी ते 2019 मध्ये रशियाला गेले होते. मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची शेवटची भेट 2022 मध्ये उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे SCO शिखर परिषदेदरम्यान झाली होती. 2023 मध्ये भारतात झालेल्या G-20 परिषदेसाठी पुतीन आले नव्हते.पीएम मोदींनी X वर पोस्ट केली – ‘मी मॉस्कोला पोहोचलो आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. रशिया आणि मॉस्को यांच्यातील मजबूत संबंधांचा दोन्ही देशांतील जनतेला फायदा होईल.पंतप्रधान मोदी मॉस्कोमधील हॉटेल कार्लटन येथे पोहोचले, तेथे त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या भारतीय समुदायातील लोकांचे अभिवादन स्वीकारले.
