Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अखेर कॅन्सरशी झुंज अयशस्वी, ज्युनिअर महमूद यांचं निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Date:

मुंबई : मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली. ज्युनिअर महमूद यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी झुंजत होते. जुहू येथील कब्रस्तानात ज्युनिअर मेहमुद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव त्यांना मेहमुद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केलं असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. नैनिहाल हा त्यांचा पहिला सिनेमा होता. परिवार, ब्रह्मचारी, फरिश्ता, प्यार ही प्यार, कटी पतंग, आन मिलो सजना, कर्ज चुकाना है.. या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

ज्युनिअर महमूद यांना फुफ्फुसं आणि लीव्हरमध्ये कॅन्सर होता. त्याशिवाय त्यांच्या आतड्यांमध्येही ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला होता. त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. ते मागील काही दिवस व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी १ वाजता ज्युनिअर महमूद यांच्यावर सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ज्युनिअर महमूद अर्थात नईम सैय्यद यांचा १५ नोव्हेंबर १९५६ रोजी जन्म झाला . ते नऊ वर्षांचे असताना त्यांचा मोठा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत स्टील फोटोग्राफी करीत होता. ते शुटींग करुन आल्यावर त्यांच्याकडून रसभरीत, फिल्मी किस्से ऐकून नईम यांना चित्रपटाविषयी आकर्षण वाटू लागले. नईमच्या हट्टाखातर, मोठा भाऊ त्याला शुटींगच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याला शांतपणे बसायला सांगून तो आपल्या कामात मग्न झाला. शुटींग पहात असताना नईमला असे दिसले की, त्याच्याच वयाचा एक मुलगा, टेकच्या वेळी सारखे संवाद विसरत होता. तो सहज बोलून गेला, ‘एवढे साधे संवाद बोलू शकत नाही?’ हे पाठमोऱ्या दिग्दर्शकाने ऐकले व नईमला विचारले, ‘तू बोलू शकशील का?’ नईमने फक्त होकार दिला नाही तर प्रत्यक्षात, एकही रिटेक न घेता ते काम करुन दाखवले. त्या कामाचे त्याला, रोख पाच रुपये मिळाले.. ही भविष्यातील यशस्वी कारकीर्दीची, त्याची पहिली पायरी होती!
१९६६ चा ‘मोहब्बत जिंदगी है’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ६७ साली ‘नौनीहाल’ मध्ये तो आला. १९६८ पासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही.. त्याचे सलग सहा चित्रपट तुफान गाजले. ‘वासना’, ‘संघर्ष’, ‘सुहागरात’, ‘परिवार’, ‘फरिश्ता’ व ‘ब्रम्हचारी’.
‘ब्रम्हचारी’ चित्रपटात त्याच्यासोबत ११ बाल कलाकार होते, त्यातूनही त्याने केलेली भूमिका अविस्मरणीय ठरली. या चित्रपटातील त्याचे काम पाहूनच मेहमूद यांनी त्याला आपला पट्टशिष्य मानून, ज्युनियर मेहमूद हे नाव दिले…
१९६९ सालामध्ये त्याचे तब्बल नऊ चित्रपट पडद्यावर झळकले. ‘विश्वास’, ‘सिमला रोड’, ‘राजा साब’, ‘प्यार ही प्यार’, ‘नतीजा’, ‘चंदा और बिजली’, ‘बालक’, ‘अंजाना’, ‘दो रास्ते’. यातील ‘दो रास्ते’ चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला.
१९७० साली ज्युनियर मेहमूदने पाच चित्रपट केले. ‘यादगार’, ‘कटी पतंग’, ‘घर घर की कहानी ‘, ‘बचपन’, ‘आन मिलो सजना’. यातील सुपरस्टार राजेश खन्ना सोबतचे ‘कटी पतंग’ व ‘आन मिलो सजना’ यांनी विक्रमी यश संपादन केले. दोन्ही चित्रपटातील नायिका, आशा पारेखच होती. ‘आन मिलो सजना’ मधील ‘पलट मेरी जान…’ या गाण्याला, ज्युनियर मेहमूदने आपल्या मिष्कील अदाकारीने चार चाॅंद लावलेले आहेत..
१९७१ साली ज्युनियर मेहमूदचं वय पंधरा वर्षांचं झालं होतं. आता तो बाल कलाकार राहिलेला नव्हता, तरीदेखील त्याच्या बारीक अंगकाठीमुळे तो दहाबारा वर्षांचाच दिसत होता.. ‘उस्ताद पेट्रो’, ‘रामू उस्ताद’, ‘लडकी पसंद है’, ‘जोहर मेहमूद इन हाॅंगकाॅंग’, ‘कारवाॅं’, ‘हाथी मेरे साथी’, ‘छोटी बहू’, ‘चिंगारी’, ‘हंगामा’, ‘खोज’ व देव आनंदच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटांतून तो दिसला.
१९७२ साली त्याने ‘बाॅम्बे टू गोवा’ या चित्रपटात, सिनियर मेहमूद बरोबर काम केले. या सहा वर्षांत त्याने आपले बालपण विसरुन एखाद्या मोठ्या कलाकारा प्रमाणे रात्रंदिवस काम केले. त्याचे वडील, रेल्वेत नोकरीला होते. त्यांना महिना ३२० रुपये एवढाच पगार होता.. त्याच वेळी ज्युनियर मेहमूदचं मानधन ‘पर डे ३००० रुपये’ होतं! त्या काळी मुंबईत ‘एम्पाला’ या परदेशी कार फक्त बारा होत्या. त्यातील एक ज्युनियर मेहमूदची होती. तो या कारने शुटींगसाठी जात असे. त्याने राज कपूर सोडून देव आनंद, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोजकुमार, इत्यादी सर्व यशस्वी हिरोंसोबत काम केल़ेले आहे. साठ व सत्तरच्या दशकातील कौटुंबिक चित्रपटात आवर्जून लहान मुलांच्या भूमिका असायच्या. त्यांच्या तोंडी गाणं, पॅरोडी असायचीच.
१९७५ पासून ज्युनियर मेहमूदचे आलेले चित्रपट फारसे कुणाच्या लक्षात नसतीलही.. ‘रोमिओ इन सिक्कीम’, ‘आपबिती’, ‘फर्ज और प्यार’, ‘लव्हर्स’, ‘फुलवारी’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘सदा सुहागन’ या चित्रपटांतून, सचिन सोबतचे ‘गीत गाता चल’ व ‘अखियों के झरोखोंसे’ हे चित्रपट मात्र कायमस्वरूपी लक्षात राहिले!
ज्युनियर मेहमूदने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २६५ चित्रपट केले आहेत. १९८५ नंतरचे चित्रपट स्वीकारताना त्याने ‘बी ग्रेड’चे चित्रपट नाकारायला हवे होते. तो ‘शिक्का’ एकदा पडला की, तुम्ही कमावलेले नाव खराब होते. अनेक नामवंत कलाकारांनी, आपल्या कारकीर्दीत अशा चुका केलेल्या आहेत.
ज्युनियर मेहमूदने सहा चित्रपटांची निर्मिती व त्यांतील काहींचे दिग्दर्शनही केले आहे. त्यातील दोन पंजाबी, एक आसामी व तीन मराठी आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ ही कौटुंबिक व मुलांसाठीची ‘तेनालीराम’ या टीव्ही वरील मालिकेत त्याने मुल्ला नसीरुद्दीनची भूमिका साकारलेली आहे. गेल्या चार वर्षांपर्यंत त्याने काम करणे चालू ठेवले होते. नंतर मात्र विश्रांती घेतली होती. अलीकडे वजन झपाट्याने कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासण्या केल्या असता डाॅक्टरांनी हा आजार बळावल्याचे सांगितले..
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना या आजाराने ग्रासलेले आहे. त्यातील काहींनी वेळीच उपचार करुन त्यावर मातही केलेली आहे. याला कारणीभूत ठरते, या सिने कलाकारांची जीवनशैली! अतिश्रम, रात्रंदिवस काम करणे, अवेळी जेवण, व्यसनं, मानसिक ताणतणाव यामुळे उतारवयात त्यांना शरीर साथ देत नाही…
ज्युनियर मेहमूद यांना मी प्रत्यक्ष पाहिलं ते १९९० साली, मुंबईतील कमलीस्तान स्टुडिओमध्ये. त्यावेळी मी ‘सूडचक्र’ चित्रपटासाठी स्टील फोटोग्राफी करीत होतो. लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांच्यावर एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचे नांव होते, ‘मस्करी’! त्याना घेऊन पुण्यातील मोहनकुमार भंडारी यांनी ‘ज्युनियर मेहमूद म्युझिकल नाईट’चे अनेक कार्यक्रम केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडी येथील संजय गांधी हॉस्पिटल तातडीने सुरू करा: आम आदमी पार्टी

पुणे: बोपोडी येथील संजय गांधी हॉस्पिटल नव्याने बांधले गेले....

मुंबई व प्रमुख महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार –प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नागपूर दि. 12 डिसेंबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

महापालिकेच्या २३ सेवकांना,वारसांना समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेचे सव्वादोन कोटी रुपयांचे वाटप

पुणे- महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी,कर्मचारी यांचेसाठी समुह वैयक्तिक अपघात...

गिरीश महाजन यांना मस्ती आली, त्यांना राजकारणातून बाहेर फेका:अंजली दमानिया यांचा थेट हल्ला

मुंबई- नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड प्रकरणावरून राज्यभरात...