पुणे-भारताबाहेर परदेशात ग्रॅनाइट संगमरवरी स्लॅबच्या नावाखाली दुर्मिळ प्रजाती असलेले रेड सॅंर्डस ( रक्तचंदन) लाकूड तस्करी केल्या जाणाऱ्या प्रकारावर सीमाशुल्क (डीआरआय )च्या पुणे प्रादेशिक विभागाने गाेपनीय देखरेख ठेवली. त्यावेळी संबंधित माल निर्यातीसाठी देशाबाहेर पाठविण्याकरिता न्हावा शेवा बंदरात (जेएनपीटी) बंदरात कंटनेर मध्ये भरुन पाठविण्यास सज्ज असताना, डीआरआयने छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी कंटनेर मध्ये सहा टन रेड सँर्डस पाॅलिश केलेल्या ग्रॅनाईट स्लॅब आणि सिमेंटच्या विटांच्या मागे लपवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीआरआय पथकाने अधिक तपास करत, विविध ठिकाणी छापेमारी करत एकूण ७.९ कोटी रुपयांचे आठ मेट्रिक टन रेड सँर्डस लाकूड जप्त केल्याची माहिती दिली आहे.
रेड सँर्डस हे संरक्षित प्रजाती असून सीमाशुल्क कायदा, १९६२ अंर्तगत तिची निर्यात प्रतिबंधित करण्यात आली आहे. जेएनपीटी मध्ये तब्बल सहा टन रेड सँर्डस मिळून अाल्यावर सदर माहीतीच्या आधारे अहमदनगर, नाशिक अाणि हैद्राबाद येथे तपास सुरु करण्यात आला. त्यानुसार नाशिक येथील एका गाेदामाची झडती घेून त्यात दाेन मेट्रिक टन रेड सँर्डस जप्त करण्यात आले.
ते लवकरच परदेशात निर्यात केले जाणार हाेते. न्हावाशेवा बंदरात जप्त करण्यात आलेले सहा मेट्रिक टन रेड सँर्डस हे देखील याच गाेदमात साठवून निर्यातीसाठी बाहेर काढण्यात आले हाेते. त्यानुसार एकूण आठ मेट्रिक टन रेड सँर्डस लाकूड सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी निर्यातदार,दलाल, गाेदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदारासह पाचजणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे.