पुणे:महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार बंद व्हावा, या मागणीसाठी पुण्यातील स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या वतीने अध्यक्ष हलीमा शेख, संविधान ग्रुपचे संस्थापक सचिन गजरमल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील उद्योजक,सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयासमोर दि.२६ जून रोजी धरणे आंदोलन केले.भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून पुण्यातील उद्योग व्यावसायिकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
उद्योगांना आवश्यक असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास मंडळातील पुणे विभागीय अधिकारी रवींद्र आंधळे, मुंबई कार्यालयातील फील्ड ऑफिसर अभिजित कसबे हे दोन भ्रष्ट अधिकारी उद्योगांची पिळवणूक करून आठ – नऊ महिने कंपन्यांना संमती पत्र देत नाहीत. भरमसाट रकमेची मागणी करतात.महिलांना तुच्छ वागणूक देतात. दुसरीकडे प्रदुषण करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाईची मागणी केल्यास दुर्लक्ष करतात. कन्सेंट असेसमेंट बैठकांचे तपशील अपलोड न करुन कामचुकार पणा करतात. त्यांचा कामचुकार पणामुळे राज्यातील उद्योग त्रासून बाहेर जात आहेत. या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मंडळाच्या सचिवांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.उद्योजक मेळावा घेऊन लवकरात लवकर छोट्या मोठ्या उद्योगांना संमती पत्र देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
धरणे आंदोलन प्रसंगी स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या अध्यक्ष हलिमा शेख,संविधान ग्रुपचे संस्थापक सचिन गजरमल ,अध्यक्ष राकेश सोनवणे ,कमरुन्निसा शेख ,मुदस्सर शेख,सागर जगताप, तुषार पवार,प्रवीण सोनवणे,कमरुनिसा शेख (अध्यक्ष प महाराष्ट्र महा विकास समिती),जाविदमीया जहागिरदार,शमा शेख,मुमताज,नुरजहाँ आदी सहभागी झाले.