पुणे-पुणे महीला मंडळ पर्वती येथे पुणे महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली माननीय रामदेवबाबा यांच्या शिष्या सौ. नेहाताई नाटेकर या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला.सौ.नेहाताई नाटेकर यांना अयोध्येमधे श्री. अय्यंगार योग भूषण ॳॅवार्डने सन्मानित करण्यात आले.त्यांना गोल्डमेडल मिळाले याबद्दल पुणे महिला मंडळातर्फे मंडळाच्या अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी यांनी सौ. नेहाताई नाटेकर यांचा शाल व श्रीफळ व श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच सौ. केतकीताई कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी योगविद्येला मोठ्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे आणि पुणे महिला मंडळातर्फे दरवर्षी योगदीवस उत्साहात साजरा केला जातो व त्यासाठी सर्व शाखातील महिलांचा लक्षणीय सहभाग असतो हेच या कार्याक्रमाच्या यशाचे गमक आहे.असे सांगितले.त्यानतर सौ. नेहाताई नाटेकर यांनी शंखवादनाने योगप्रशिक्षणाची सुरवात केली.याप्रसंगी सौ. नेहाताई नाटेकर यांनी सर्वांना सोपी व सहज करता येणारी योगासने शिकवली व खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे घालावे हे शिकवले ,सर्वांना मार्गदर्शन करताना प्राणायमाचे प्रकार त्याचे फायदे त्यांनी सांगितले तसेच महत्वाचे म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ व त्वचा ओघळू नये म्हणून फेस योगा करावा सांगून फेसयोगाबाबत प्रशिक्षण दिले. ” नको औषध नको गोळी ,रोज वाजवू आपण टाळ्या , रोज करो योग करो हा संदेश त्यांनी दिला. शेवटी विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उल्का शहा यांनी केले तर आभार प्रदर्शश सहाय्यक सेक्रटरी सौ.वैशाली देशपांडे यांनी केले नंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.