पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेवरील पराभवानंतर नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यापुर्वीच एका कार्यकर्त्याच्या बॅनरमुळे मोठा वाद रंगला. बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मुख्य म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यात दौऱ्यावर असताना हा सगळा प्रकार घडला आहे. मारहाण करणारे पाच ते सहा जण होते .मिळालेल्या माहितीनुसार,फलकबाजी करणारा हा कार्यकर्ता, पुणे काँग्रेसचा जुना पदाधिकारी आहे.मात्र तो नेहमीच वादग्रस्त राहिला आहे .लोकसभेच्या उमेदवारीवरून एका ज्येष्ठ नेत्याने भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी काँग्रेस भवनबाहेर बॅनर झळकवले होते. तर आज पुन्हा एक बॅनर त्याच्याकडून झळकवण्यात आलं आहे. ज्या मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नाव लिहिण्यात आली आणि प्रश्न विचारण्यात आला की आता तरी ‘या जगामध्ये बदल होणार का नाही?’ यामध्ये पाहिलं नाव होतं ते काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले, उल्हास पवार,माजी आमदार मोहन जोशी, पुन्हा २ जेष्ठनेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,बागवे , माजी नगरसेवक अभय छाजेड, माजीआमदार महापौर दीप्ती चौधरी, माजी महापौर कमलताई व्यवहारे, काँग्रेस नेते वीरेंद्र किराड, संजय बालगुडे… अशा काही नेत्यांची नावे आणि उल्लेख त्या बॅनर वर होता.
मुळात ज्यांची नावे फलकावर त्याने लावली त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे सरार्स दुर्लक्ष केले आणि भलतेच कोणी तरी त्यास मारहाण करून गेल्याचे समजते आहे.
–संबधित फलकबाजी करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव मुकेश धिवार असून मारहाण झालेबाबत त्यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार नोंदविल्याचे समजते आहे
.दोन दिवसांपूर्वी श्री शंकर महाराज मठात हाणामारी झाली होती. त्यावेळी मुकेश धिवार देखील मठात उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात भाजप आणि रा. स्व. संघाच्या हिंदुत्वावर टीका करणारा व्हिडिओ मठामध्ये रेकॉर्ड करून समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. आता, धिवार यांनाच कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.