मुंबई:
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे संध्याचे स्पीड 130 प्रतितास इतके आहे. मात्र आाता 15 ऑगस्टपासून ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाने मुंबई आणि वडोदरा विभागांना 30 जूनपर्यंत वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेले काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान रेल्वेचे अंतर 491 किमी आहे आणि सध्या वंदे भारत एक्सप्रेसने या मार्गावरील प्रवासासाठी 5 तास 15 मिनिटे लागतात. मात्र आता ट्रेनचा वेग 160 प्रतितास झाल्यानंतर प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांपर्यंत बचत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुंबई-अहमदाबाद या मार्गावर सध्या दोन वंदे भारत गाड्या धावतात. एक ट्रेन रविवारी धावते आणि दुसरी ट्रेन बुधवार वगळता आठवड्याच्या इतर दिवशी धावते. ट्रेन क्रमांक 22962 अहमदाबाद – मुंबई सेंट्रल मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून 6:10 वाजता सुटते आणि 11:35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचते. ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली सारख्या काही स्थानकांवर थांबते.ट्रेन क्रमांक 22961 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल वरुन 15:55 वाजता सुटते आणि 21:25 वाजता अहमदाबादला पोहोचते. या प्रवासात ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्थानकावर थांबते. आता या वेळेत कपात होणार आहे.
वंदे भारत ट्रेनच्या डब्याच्या बाहेर रियर व्ह्यू कॅमेरासह चार प्लॅटफॉर्म-साइड कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. वेंटिलेशन, एअर कंडिशनिंगसाठी कॉम्प्रेसर बसवण्यात आले आहेत. तसेच या ट्रेनमध्ये अनेक इतरही अनेक महत्वाच्या सुविधा देण्यात आल्या.