पुणे -इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन आर. आय. टी. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने शनिवार (दि.22) सायंकाळी 4 वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यासाठी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या 1983 पासूनचे सर्व डिग्री, डिप्लोमा, एमबीए, एमटेक, बीबीए, पीएचडी या शाखांचे माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्यासाठी जगभरातील 21 देशांमधून तसेच भारतातील 20 राज्यातून 2300 माजी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे जयंतराव पाटील, माजी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. तसेच भगतसिंह पाटील, अध्यक्ष, नियामक मंडळ, आर. आय. टी., प्रतीक पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना लि.,राजवर्धन पाटील, सदस्य, नियामक मंडळ, आदित्य पाटील, प्रा. शामराव पाटील सदस्य, नियामक मंडळ, प्राचार्य आर. डी. सावंत सचिव, कासेगाव शिक्षण संस्था इत्यादी आदी उपिस्थत राहणार असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी सांगितले.
या मेळाव्याचे संयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉ. ललित कुमार जुगुळकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. मंझर मिर्झा व माजी विद्यार्थी समितीचे सर्व सदस्य करीत आहेत. तरी माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.