~ ‘हॅपी 500 टु यू कॅम्पेनसह यश साजरे करणार’- ‘H500TU’ कुपन कोड वापरून चेकआउटवेळेस अमर्यादित १० टक्के सवलत देणार
पुणे-– क्रोमातर्फे ५०० वे दालन सुरू करत असल्याची घोषणा करण्यात आली असून कंपनीचा विकास आणि विस्ताराच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा साजरा करण्यासाठी ‘हॅपी 500 टु यू’ हे कॅम्पेन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे क्रोमाची दर्जेदार इलेक्ट्रॉनिक उत्पादने, देशभरातील वेगान विस्तारणाऱ्या ग्राहकवर्गाला असामान्य सेवा देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
ही लक्षणीय कामगिरी साजरी करण्यासाठी आणि ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रोमाने खास प्रमोशन योजना सुरू केली आहे. त्यानुसार १९ जून ते २३ जूनदरम्यान क्रोमा दालने, Croma.com आणि टाटा न्यूमध्ये खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना चेकआउटच्या वेळेस ‘H500TU’ हा कुपन कोड वापरून १० टक्के सवलतीचा आनंद घेता येणार आहे. या मर्यादित काळासाठीच्या योजनेद्वारे कंपनी इतकी वर्श अतूट विश्वास आण पाठिंबा देणाऱ्या ग्राहकांचे आभार मानत आहे. हे प्रमोशन अजून खास आहे, कारण त्यावर वापराची कोणतीही मर्यादा नाही आणि ते क्रोमा स्टोअर्स, Croma.com आणि टाटा न्यूसह सर्व विक्री चॅनेल्सवर उपलब्ध आहे.
क्रोमा इन्फिनिटी – रिटेल लि.चे उप- मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिबाशीष यामहत्त्वाच्या टप्प्याविषयी म्हणाले, ‘आमचे ५०० वे दालन जास्त खास आहे, कारण त्यामुळे ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याची आमची बांधिलकी त्यातून दिसून येते. आम्ही आता देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलो असून यापुढेही विस्तार करत राहण्याचे व देशभरातील ग्राहकांपर्यंज गॅजेट्स उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.’
स्थापनेपासून घराघरात पोहोचलेला इलेक्ट्रॉनिक रिटेल ब्रँड बनेपर्यंतचा क्रोमाचा प्रवास सातत्यपूर्ण नाविन्य व ग्राहकाभिमुख धोरणांनी परिपूर्ण आहे. आज क्रोमा भारतातील राष्ट्रीय पातळीवरील, मोठ्या फॉरमॅटमधील खास आणि बहुमाध्यमिक रिटेलर म्हणूनच प्रचलित आहे. ब्रँडद्वारे ५५० पेक्षा जास्त ब्रँडची १६,००० उत्पादने, १८० पेक्षा जास्त शहरांत उपलब्ध करून दिली जातात. ही विस्तृत उत्पादन श्रेणी आणि विस्तारित व्याप्ती ग्राहकांना ऑनलाइन तसेच रिटेल पातळीवर सर्वोत्तम उत्पादने मिळवून देते.
‘हॅपी 500 टु यू’ कॅम्पेनच्या अधिक माहितीसाठी आणि उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी जाणून घेण्यासाठी क्रोमा दालन किंवा टाटा न्यू किंवा Croma.com ला भेट द्या. क्रोमाच्या मर्यादित काळाच्या ऑफरचा लाभ घ्या आणि तुमच्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक सवलत मिळवा.