मुंबई, 20 जून, २०२४: वारी एनर्जीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादक कंपनीने राजस्थानच्या बिकानेरमध्ये 280 MW (DC) प्रगत सौर मॉड्यूल्सचा पुरवठा करण्यासाठी रिन्यूएबल इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर (IPP) (स्वतंत्र अक्षय ऊर्जा उत्पादक) महिंद्रा सस्टेन सोबत केलेल्या कराराची घोषणा केली आहे. वारी एनर्जीज लिमिटेडची ३० जून २०२३ (स्रोत: क्रीसील अहवाल) पर्यंतच्या आकडेवारीनुसार 12 GW क्षमतेची सर्वात मोठी स्थापित क्षमता आहे. करारामध्ये वारी एनर्जीज लिमिटेड च्या ELITE मालिका, N-Type TopCon 580Wp मॉड्यूल्सची तरतूद समाविष्ट असून ते त्यांच्या कार्यक्षमता आणि कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. हे मॉड्यूल डिसेंबर २०२४ पासून वितरित केले जातील आणि महिंद्र सस्टेनच्या महत्त्वाकांक्षी अक्षय ऊर्जा प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी डिझाइन केले आहेत.
या भागीदारीबद्दल भाष्य करताना वारी एनर्जीज लिमिटेडच्या विक्री विभागाचे संचालक श्री. सुनील राठी म्हणाले, “महिंद्रा सस्टेनसोबत भागीदारी करणे ही आमच्या कंपनीसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की या सहकार्यातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जात आहे. आमच्या ELITE मालिका मॉड्यूल्सच्या 280 मेगावॅटचा पुरवठा करून, आम्ही भारताच्या शाश्वत ऊर्जा मिशनसाठी असलेली आमची बांधिलकी दर्शवत आहोत. आमच्या कंपनीच्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी धोरणात्मक भागीदारीद्वारे व्यापकपणे पर्यावरणपूरक ऊर्जा सुविधा अंगीकार करण्यासाठीचा आग्रह आहे. या भागीदारीतून केवळ आमच्या तांत्रिक क्षमताच नव्हे, तर सर्वांसाठी हरित आणि अधिक ऊर्जा-कार्यक्षम भविष्य घडवण्याचा आमचा विश्वास दिसून येण्याची आशा आहे. एकत्रितपणे आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी नवकल्पना आणि शाश्वततेला चालना देणाऱ्या स्वच्छ उर्जा उपाय सुविधांचे परिक्षेत्र पुन्हा परिभाषित करू.”
महिंद्रा सस्टेनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक ठाकूर यांनी उत्साह व्यक्त केला, “वारी एनर्जीज लिमिटेड सोबत या आर्थिक वर्षात आमची दुसरी ऑर्डर जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. वारीची ‘मेड-इन-इंडिया’ उत्पादने वापरुन हा सहयोग ‘आत्मनिर्भर भारत’ या आमच्या वचनबद्धतेतील महत्त्वाची वाटचाल दाखवितो. दोन्ही कंपन्या अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी वचनबद्ध आहेत. या ऑर्डर मधून आमचा सहयोग अधिक बळकट होईल. भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये योगदान देत आपल्या विकास कामांत अनेक IPP अक्षय ऊर्जा प्रकल्पांना पुढे नेण्याच्या प्रयत्नांना यातून चालना मिळत आहे.”
वारी एनर्जीज लिमिटेडच्या ELITE सिरीज मॉड्यूल्समध्ये N-Type TopCon, तंत्रज्ञान असून त्याद्वारे कामगिरी, शाश्वतता आणि ३० वर्षांची आउटपुट कामगिरी वॉरंटी पुरविली जाते. आमचा विश्वास आहे की हा करार वारी एनर्जीज लिमिटेडचा सौरऊर्जा क्षेत्रातील विश्वासार्हतेचा लौकिक मजबूत करेल आणि भारताच्या अक्षय उर्जेच्या परिक्षेत्रावर परिणाम करेल. यातून देशाला हरित आणि अधिक शाश्वत भविष्याकडे नेण्यात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.